शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

64MP कॅमेरा, 66W फास्ट चार्जिंगसह Honor X20 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: August 13, 2021 16:40 IST

Honor X20 5G launch: Honor X20 5G स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळतो. या फोनच्या मागे आकर्षक वर्तुळाकार ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.  

ठळक मुद्देHonor X20 5G स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. फ्रंट पॅनलवरील पिल शेप कटआऊटमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी मिळतो. हा ऑनर फोन Android 11 आधारित Magic UI 4.2 वर चालतो.

ऑनरने आज चीनमध्ये चार स्मार्टफोन लाँच केल्ले आहेत. एकीकडे कंपनीने आपल्या फ्लॅगशिप मॅजिक 3 सीरिजमध्ये Honor Magic 3, Magic 3 Pro आणि Magic 3 Pro+ असे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. दुसरीकडे कंपनीने आपला मिडरेंज Honor X20 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 900 SoC चा वापर केला आहे. तसेच Honor X20 5G स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळतो. या फोनच्या मागे आकर्षक वर्तुळाकार ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.  

Honor X20 चे स्पेसिफिकेशन्स 

Honor X20 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2376 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी Honor X20 स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 SoC चिपसेट आणि Mali G68 GPU मिळतो. त्याचबरोबर या  फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा ऑनर फोन Android 11 आधारित Magic UI 4.2 वर चालतो.  

Honor X20 5G च्या बॅक पॅनलवर वर्तुळाकार ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. तसेच फ्रंट पॅनलवरील पिल शेप कटआऊटमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी मिळतो. या 5G फोनमध्ये कंपनीने सिक्योरिटीसाठी साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. Honor X20 5G मधील 4,300mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Honor X20 5G ची किंमत 

Honor X20 5G स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचा छोटा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 1,899 युआन (अंदाजे 21,700 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तसेच 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 2,199 युआन (अंदाजे 25,100 रुपये) आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 2,499 युआन (अंदाजे 28,600 रुपये) मध्ये उपलब्ध झाला आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान