शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चार कॅमेर्‍यांनी सज्ज ऑनर 9 आय आता नवीन रंगात

By शेखर पाटील | Updated: November 10, 2017 13:03 IST

हुआवे कंपनीने चार कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा आपला ऑनर ९ आय हा स्मार्टफोन आता ग्रॅफाईट ब्लॅक या रंगाच्या पर्यायामध्ये ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

ठळक मुद्देहुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने गेल्या महिन्यात ऑनर 9 आय हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारला होता.स्मार्टफोन प्रेस्टीज गोल्ड आणि अरोरा ब्ल्यू या दोन रंगांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आला होता. ग्रॅफाईट ब्लॅक या रंगाचे व्हेरियंट ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने गेल्या महिन्यात ऑनर 9 आय हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारला होता. हा स्मार्टफोन प्रेस्टीज गोल्ड आणि अरोरा ब्ल्यू या दोन रंगांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आला होता. आता याचे ग्रॅफाईट ब्लॅक या रंगाचे व्हेरियंट ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.

 ऑनर 9 आय या मॉडेलची खासियत म्हणजे यात चार कॅमेरे आहेत. यात मागील बाजूस एक कॅमेरा 16 तर दुसरा 2 मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात ऑटो-फोकस, फेज डिटेक्शन, एलईडी फ्लॅश, टाईम लॅप्स, स्लो-मोशन व्हिडीओ कॅप्चर, पॅनोरामा आदी फिचर्स देण्यात आले आहेत. यात प्रतिमा काढून झाल्यानंतरही फोकस सेट करण्याची सुविधा असेल. यामुळे आधी काढण्यात आलेल्या छायाचित्रांमधून हव्या त्या प्रतिमेला फोटो इफेक्ट देता येणार आहे. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात सॉफ्ट एलईडीसह 13 व 2 मेगापिक्सल्स क्षमतांचे फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. 

ऑनर 9 आय या मॉडेलमध्ये 18:9 अस्पेक्ट रेशो असणारा 5.9 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच 2160 बाय 1080 पिक्सल्स क्षमतेचा 2.5 डी वक्राकार डिस्प्ले आहे. ऑक्टा कोअर किरीन 659 प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम 4 जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असेल. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे.हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर हुवे कंपनीचा इएमयुआय 5.1 हा युजर इंटरफेस असेल. तर यात फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 3340 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरही असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. हुआवे ऑनर 9 आय या स्मार्टफोनचे हे नवीन व्हेरियंट ग्राहकांना फ्लिपकार्टवरून ग्राहकांना 17 हजार 999  रूपये मूल्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल