शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

आले हो आले....नवीन आयफोन आले

By शेखर पाटील | Updated: September 13, 2017 02:15 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या आयफोन८ आणि आयफोन ८ प्लस या दोन नवीन मॉडेल्सचे अखेर आगमन झाले असून अ‍ॅपल कंपनीतर्फे आज आयोजित कार्यक्रमात याचे अनावरण करण्यात आले.

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या आयफोन८ आणि आयफोन ८ प्लस या दोन नवीन मॉडेल्सचे अखेर आगमन झाले असून अ‍ॅपल कंपनीतर्फे आज आयोजित कार्यक्रमात याचे अनावरण करण्यात आले.

आयफोनचे लाँचींग हा नेहमीच टेकविश्‍वातील प्रचंड औत्सुक्याचा विषय असतो. यानुसार नवीन आयफोन नेमका कोणता असेल? यात काही फिचर्स असतील? याबाबत मोठ्या प्रमाणात चर्वण झाले होते. या पार्श्‍वभूमिवर अ‍ॅपल कंपनीने एका शानदार कार्यक्रमात आयफोन या मॉडेलची नवीन आवृत्ती लाँच केली. अ‍ॅपल कंपनीने उभारलेल्या स्टीव्ह जॉब्ज थिएटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात कंपनीचे सीईओ टिम कुक यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी विविध उपकरणांची घोषणा केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी अ‍ॅपलच्या नवीन स्पेसशीप आकाराच्या भव्य कॉम्प्लेक्सची माहिती देणारा व्हिडीओ दाखविण्यात आला. यानंतर स्टीव्ह जॉब्ज यांनी हातात आयफोन घेतल्याची भव्य प्रतिमा दर्शवून त्यांचा संदेश ऐकविण्यात आला. टिम कुक यांनीही जॉब्ज यांचेच स्मरण करत कार्यक्रमास प्रारंभ केला. त्यांनी प्रारंभी नव्यानेच उभारण्यात आलेल्या अ‍ॅपल पार्कची सांगोपांग माहिती दिली. यानंतर ते मुख्य कार्यक्रमाकडे वळले. 

प्रारंभी अ‍ॅपलच्या रिटेल विभागाच्या प्रमुख अँजेला अहरेंडस् यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्यांनी सुरवातीला अ‍ॅपलने अलीकडेच सुरू केलेल्या टुडे अ‍ॅट अ‍ॅपल या इन-स्टोअर एक्सपेरियन्स कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यासोबत त्यांनी अ‍ॅपलच्या रिटेला स्टोअर्समधील विस्ताराबाबत विवेचन केले. यानंतर अ‍ॅपल स्मार्टवॉच आणि अ‍ॅपल टिव्ही लाँच झाल्यानंतर आयफोनची घोषणा करण्यात आली. यात पहिल्यांदा आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे दोन मॉडेल लाँच करण्यात आले.

आयफोन ८ आणि ८ प्लस या दोन्ही मॉडेल्समधील बरीच फिचर्स समान आहेत. यात पुढील आणि मागील बाजूस ग्लासचे आवरण देण्यात आले आहे. हे मॉडेल सिल्व्हर, स्पेस ग्रे आणि गोल्ड फिनीश या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. दोन्हींमध्ये रेटीना डिस्प्लेयुक्त अनुक्रमे ४.७ आणि ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड ट्रु-टोन डिस्प्ले देण्यात आला आहे. या दोन्ही आयफोनमध्ये थ्री-डी टच तंत्रज्ञान देण्यात आले आहे. तर डिस्प्लेमध्ये ट्रु-टोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे विविध वातावरणात राहूनही डिस्प्लेचे तापमान कायम राहते. या दोन्ही आयफोनमध्ये सिक्स-कोअर ए११ बायोनिक हा प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर आधीच्या ए१० पेक्षा अधिक गतीमान आणि कार्यक्षम असा आहे.

आयफोन ८ या मॉडेलमध्ये १२ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यात ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनची सुविधा असेल. तर आयफोन ८ प्लस या मॉडेलमध्ये १२ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात डीपर पिक्सलची सुविधा असल्यामुळे ते अन्य कॅमेर्‍यांपेक्षा ८३ टक्के अधिक प्रकाशयुक्त प्रतिमा काढू शकत असल्याचा अ‍ॅपलचा दावा आहे. यातील एक कॅमेरा एफ/१.८ अपार्चरयुक्त असेल. तर दुसरा टेलिफोटो लेन्सयुक्त कॅमेरा एफ/२.८ अपार्चरयुक्त असेल. 

आयफोन८ आणि ८ प्लस या मॉडेल्समध्ये कंपनीने विकसित केलेल्या व्हिडीओ एनकोडर देण्यात आला आहे. यात २४० फ्रेम्स प्रति सेकंद या गतीने १०८० पिक्सल्स क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर मोशन ट्रॅकींगसाठी हा कॅमेरा गायरास्कोप आणि अ‍ॅक्सलेरोमीटरचा उपयोग करणार आहे. आयफोन ८ प्लस या मॉडेलमध्ये एआरचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. अर्थात हे मॉडेल्स अ‍ॅपल एआर किटशी सुसंगत असतील. यामुळे ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीशी ऑप्टीमाईज्ड असणारे अ‍ॅप यात वापरता येतील. या अनुषंगाने या कार्यक्रमात काही एआर गेम्स दर्शविण्यात आले. या दोन्ही मॉडेल्समध्ये क्युआय या मानकावर आधारित वायरलेस चार्जींगची सुविधादेखील देण्यात आली आहे.

आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे दोन्ही मॉडेल्स ६४ आणि २५६ जीबी स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहेत. आयफोन ८च्या ६४ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य ६९९ डॉलर्स तर २५६ जीबीचे मॉडेल ७९९ डॉलर्सपासून सुरू होणारे असेल. तर आयफोन ८ प्लस या मॉडेलचे मूल्य मात्र जाहीर करण्यात आले नाही. या दोन्ही मॉडेल्सची १५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झाली असून २२ सप्टेंबरपासून ते ग्राहकांना मिळणार आहेत. 

टॅग्स :Apple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचApple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लसApple TVअ‍ॅपल टिव्हीApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X