शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सरकारचा इशारा! काही सेकंदात रिकामे होईल तुमचे खाते, चुकूनही 'हे' अॅप डाउनलोड करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 21:21 IST

मागील काही काळापासून भारतात डिजिटल पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पण, यादरम्यान सायबर गुन्ह्यांमध्येही तेवढीच वाढ झाली आहे.

नवी दिल्ली: मागील काही काळापासून भारतात डिजिटल पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पण, यादरम्यान सायबर गुन्ह्यांमध्येही तेवढीच वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यसाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. कोरोनाच्या काळात तर सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळेच आता सर्वांनी खबरदार राहण्याची गरज आहे. केंद्र सरकारने याबाबत नुकताच अलर्ट जारी केला आहे. कर्ज देण्याच्या नावाखाली खोट्या अॅपच्या फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज आहे. सायबर फ्रॉडपासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी सायबर मित्र वेळोवेळी सतर्क करत असतात. तसेच, सायबर दोस्त हे गृह मंत्रालयाचे ट्विटर हँडल आहे, जे वेळोवेळी सायबर सुरक्षेची माहिती शेअर करते.

सायबर दोस्तने अलर्ट जारी केला

सायबर दोस्त अशा बनावट अॅप्सपासून सावध राहण्याचा इशारा वेळोवेळी देत असतात. सध्या कमी व्याजदरात कर्ज देण्याच्या नावाने अनेकांची फसवणूक होत आहे. याबाबत सायबर दोस्तने ट्विट केले की, 'सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बनावट अॅप्सपासून दूर राहा. कसून चौकशी केल्याशिवाय तुमच्या मोबाइलमध्ये कोणतेही बनावट मोबाइल अॅप डाउनलोड करू नका. तसेच संबंधित लिंक उघडू नका.

गृहमंत्रालयाचे अलर्टगृह मंत्रालयाने सायबर मित्रामार्फत सांगितले की, कर्ज देणाऱ्या कंपन्यांची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर शोधणे आवश्यक आहे. कोणतेही कर्ज देणारे अॅप डाउनलोड करताना काळजी घ्या, अन्यथा तुमची वैयक्तिक माहिती, डेटा धोक्यात येऊ शकतो. कागदपत्र, पेमेंट करताना संबंधित वेबसाइट किंवा URL तपासा.

पॉप-अपद्वारे सायबर अटॅकसायबर गुन्हेगार संगणक प्रोग्रामद्वारे पोलिसांच्या नावाने पॉप-अप वापरतात. अश्‍लील मजकूरामुळे वापरकर्त्याचा संगणक ब्लॉक करण्यात आल्याचा पॉप-अप अहवाल सायबर गुन्हेगार पोलिसांच्या नावाने पाठवतात. पॉप-अपमध्ये असेही म्हटले जाते की संगणक अनब्लॉक करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. यांसह इतर विविध गोष्टींमधून तुमचे कॉम्प्युटर किंवा मोबाईल हॅक केला जातो आणि तुमची महत्वाची माहिती चोरली जाते.

काय करू नये?सायबर दोस्तने अशा नोटिसांपासून सावध राहण्यास सांगितले आहे. तसेच, आपल्या संगणकाच्या अँटीव्हायरस प्रोग्रामवर वेळोवेळी क्लिक करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय, तुम्हाला पॉप-अपमध्ये पैसे देण्यास सांगितले असल्यास, कोणतेही पेमेंट करू नये. पॉप-अप किंवा संदेशातील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असा सल्ला सरकारकडून देण्यात येत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी