शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गुगलने Play Store वरून 43 मोबाईल अ‍ॅप्स हटवले; तुम्हीही त्वरित करा डिलीट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 16:21 IST

या अ‍ॅप्सवर गुगल प्ले डेव्हलपर पॉलिसीचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.

नवी दिल्ली : गुगलने (Google) आपल्या Play Store वरून 43 मोबाईल अ‍ॅप्स हटवले आहेत, ज्यामध्ये मालवेअर किंवा व्हायरस आहे. हे अ‍ॅप्स एकूण 2.5 मिलियन वेळा डाउनलोड केले गेले. या अ‍ॅप्सवर गुगल प्ले डेव्हलपर पॉलिसीचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. फोनची स्क्रीन बंद असतानाही हे अ‍ॅप्स जाहिराती दाखवत होते.

McAfee ने आपल्या रिपोर्टमध्ये या अ‍ॅप्सची माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, फोन बंद स्क्रीनवर जाहिराती दाखवल्याने बॅटरी जलद संपते आणि युजर्सना त्रास होतो. याशिवाय, डेटा लीक होण्याचाही धोका आहे. प्ले स्टोअरवरून काढून टाकलेल्या 43 अ‍ॅप्समध्ये TV/DMB प्लेयर, म्युझिक डाउनलोडर आणि न्यूज आणि कॅलेंडर अ‍ॅप्सचा समावेश आहे. जास्तकरून अ‍ॅप्स मीडिया स्ट्रीमिंग आहेत. या अ‍ॅप्सवर फसवणुकीच्या कारवायांमध्ये गुंतल्याचाही आरोप आहे. 

याचबरोबर,  या अ‍ॅप्सच्या मदतीने दूरवर बसूनही यूजरचा फोन नियंत्रित करता येऊ शकतो, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे अ‍ॅप्स लोकांचे मेसेज वाचण्यास आणि स्टोरेज पाहण्यास देखील सक्षम होते. हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांना इतर अ‍ॅप्सच्या आधी नोटिफिकेशन्स दाखवण्याची विनंती करतात. बँकिंग फसवणुकीसाठी या अ‍ॅप्सचा वापर केला जाऊ शकतो.

टाळण्यासाठी काय करावे?एखाद्या विशिष्ट अ‍ॅपमुळे तुमच्या फोनची स्क्रीन वारंवार चालू होत असल्याचे तुम्हाला वाटत असेल तर सेटिंग्ज तपासा. शक्य असल्यास ते अ‍ॅप हटवा. तसेच बॅकग्राउंड अ‍ॅप रिफ्रेश देखील बंद करा. याचा फायदा असा होईल की स्क्रीन बंद झाल्यानंतर कोणतेही अ‍ॅप बॅकग्राउंडमध्ये चालणार नाही आणि तुमच्या फोनची बॅटरी लाइफही चांगली होईल. याशिवाय, कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी, प्ले स्टोअरवर त्याचे रिव्ह्यू नक्कीच तपासा.

टॅग्स :google payगुगल पेtechnologyतंत्रज्ञान