शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये असणार Samsung चा 50MP कॅमेरा आणि 5G मॉडेम; स्पेक्स झाले लीक 

By सिद्धेश जाधव | Updated: August 12, 2021 18:28 IST

Pixel 6 Camera: Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात येईल हा एक सॅमसंग सेन्सर असेल.

ठळक मुद्देPixel 6 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात येईल हा एक सॅमसंग सेन्सर असेल. Android 12 beta कोड्समधून पिक्सल फोनमधील Samsung Exynos 5123 मॉडेमचा खुलासा झाला आहे.

गेल्या आठवड्यात Google Pixel 6 आणि 6 Pro स्मार्टफोनच्या लाँचची माहिती गुगलने दिली होती. गुगलने सांगितले होते कि हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या नव्या Tensor चिपसेटसह बाजारात येतील. या स्मार्टफोनची डिजाईन देखील तेव्हा समोर आली होती. आता टेक कम्युनिटी XDA ने आपल्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये Google Pixel 6 स्मार्टफोनच्या कॅमेरा आणि मुख्य कनेक्टिविटी मॉडेमची माहिती दिली आहे. वेबसाईटच्या रिपोर्टनुसार Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात येईल हा एक सॅमसंग सेन्सर असेल. त्याचबरोबर या फोनमध्ये Exynos 5123 5G मॉडेम देण्यात येईल.  

XDA ने या स्पेसिफिकेशन्सची माहिती Android 12 प्रीव्यू रिलीजच्या माध्यमातून मिळवली आहे. लेटेस्ट अँड्रॉइड 12 बीटामधील प्रीलोडेड गुगल कॅमेरा अ‍ॅपच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे. Google Camera APK च्या कोडमधून समजले कि गुगलच्या आगामी स्मार्टफोनमध्ये Samsung GN1 वाईड कॅमेरा सेन्सर दिला जाईल. सॅमसंगचा GN1 नवीन 50 मेगापिक्सलचा सेन्सर आहे जो ड्युअल पिक्सल ऑटोफोकसला सपोर्ट करतो.  

Android 12 beta कोड्समधून पिक्सल फोनमधील Samsung Exynos 5123 मॉडेमचा खुलासा झाला आहे. हा सॅमसंगचा फ्लॅगशिप 5G मॉडेम आहे, जो Sub-6 आणि mmWave अश्या दोन्ही कनेक्टिव्हिटीना सपोर्ट करतो. या मॉडेमला Google Tensor चिपसेटची जोड देण्यात येईल. Google Pixel 6 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा 90Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच Pixel 6 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD+ 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो.  

टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड