शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

गुगलचा सर्वात स्वस्त पिक्सल स्मार्टफोन लाँच; Pixel 5A 5G देणार कमी किंमतीत प्रीमियम फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: August 18, 2021 11:35 IST

Google Pixel 5A Launch: गुगलने काल नवीन पिक्सल स्मार्टफोन Google Pixel 5A टेक मंचावर सादर केला आहे. या स्मार्टफोनचे बरेचशे फीचर्स गतवर्षीच्या Pixel 4A सारखे आहेत फक्त या स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि बॅटरीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे.  

ठळक मुद्देया स्मार्टफोनचे बरेचशे फीचर्स गतवर्षीच्या Pixel 4A सारखे आहेत गुगल पिक्सल 5ए स्मार्टफोनचा एकमेव 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 449 डॉलर्समध्ये लाँच करण्यात आला आहे. हा ड्युअल मोड 5जी असलेला स्मार्टफोन IP67 रेटिंगसह सादर केला गेला आहे.

गेल्या महिन्यात Google ने आगामी आपली Pixel 6 सीरिजची झलक दाखवली होती. त्यामुळे कंपनी आपला मिड रेंज स्मार्टफोन लाँच करणार नाही अश्या चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु तसे झाले नाही गुगलने काल नवीन पिक्सल स्मार्टफोन Google Pixel 5A टेक मंचावर सादर केला आहे. या स्मार्टफोनचे बरेचशे फीचर्स गतवर्षीच्या Pixel 4A सारखे आहेत फक्त या स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि बॅटरीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे.  

Google Pixel 5A चे स्पेसिफिकेशन्स 

Google Pixel 5A स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.34-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा पंच-होल ओएलईडी डिस्प्ले 700निट्स ब्राइटनेस आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Pixel 4A प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. या पिक्सल फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच झालेला हा स्मार्टफोन लवकरच अँड्रॉइड 12 वर अपडेट होईल.  

हे देखील वाचा: 108MP कॅमेरा असलेला स्वस्त मोटोरोला स्मार्टफोन भारतात लाँच; इथून विकत घेता येणार Motorola Edge 20 Fusion

गुगल पिक्सल 5ए स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा आहे. यात एलईडी फ्लॅशसह 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा ड्युअल मोड 5जी असलेला स्मार्टफोन IP67 रेटिंगसह सादर केला गेला आहे. सिक्योरिटीसाठी या पिक्सल फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पिक्सल 5ए स्मार्टफोनमधील 4,680mAh ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

हे देखील वाचा: Redmi 10 सह अजून स्वस्त स्मार्टफोन येणार बाजारात; वेबसाईट लिस्टिंगमधून झाला खुलासा

Google Pixel 5A ची किंमत  

गुगल पिक्सल 5ए स्मार्टफोनचा एकमेव 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 449 डॉलर्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ही किंमत 33,400 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन भारतात लाँच होणार कि नाही याची कोणतीही माहिती समोर आली नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार हा पिक्सल स्मार्टफोन अमेरिका व जापानमध्ये उपलब्ध होणार आहे.  

टॅग्स :googleगुगलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड