शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर...लवकरच कॉल दर होणार स्वस्त !

By शेखर पाटील | Updated: August 14, 2017 14:00 IST

भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण अर्थात ट्रायच्या एका निर्णयामुळे लवकरच मोबाईलच्या कॉल दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण अर्थात ट्रायच्या एका निर्णयामुळे लवकरच मोबाईलच्या कॉल दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.भारतीय सेल्युलर सेवा पुरवणार्‍या कंपन्यांवर नियंत्रणाचे काम ट्राय करत असते. येत्या काही दिवसातच ट्रायतर्फे एका महत्वाच्या मुद्याबाबत घोषणा होण्याची शक्यता असून यामुळे कॉल दरांमध्ये घट होणार असून साहजीकच मोबाईलय युजर्सला लाभ होणार आहे. देशातील कोणत्याही मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीकडे परिपूर्ण पायाभूत सुविधा नाहीत. यामुळे काही सेवांसाठी इतर कंपन्यांवर अवलंबून रहावे लागत असते. यातील सर्वात मोठी सेवा म्हणजे इंटरकनेक्ट युजेस चार्जेस म्हणजे आययूसी होय. ही इंटरकनेक्टीव्हिटी साठीची प्रणाली होय. समजा माझ्याकडे एयरटेल कंपनीचा मोबाईल असून मी आयडिया वा अन्य दुसर्‍या कंपनीच्या युजरशी बोलतोय. यावेळी त्या युजरला इनकमींगचे पैसे लागत नाहीत. मात्र हा कॉल पूर्ण होण्यासाठी एयरटेल कंपनी आयडियाला पैसे देत असते. याच पध्दतीने मोबाईल कंपन्या एकमेकांना कॉल दराची रक्कम अदा करत असतात. २००३ साली ट्रायने मोबाईल कंपन्यांसाठी कॉलींग पार्टी-पे म्हणजेच सीपीपी या नावाने प्रणाली लागू केल्यानंतर या पध्दतीची आकारणी उदयास आली. आधी एका मिनिटाला तब्बल १.१० रूपये इतके आकारले जात होते. ही रक्कम कमी होत आता १४ पैशांवर आली आहे. अर्थात कंपन्या एकमेकांना आपल्या युजर्सच्या कॉल साठी या दराने रक्कम अदा करत असतात. मात्र अलीकडच्या काळात फोर-जी व्हाईस ओव्हर नेटवर्क अर्थात व्हिओ-एलटीई सेवेचा उदय झाल्यानंतर १४ पैशांची रक्कम जास्त असल्याचा युक्तीवाद काही कंपन्यांनी केला. विशेष करून रिलायन्स जिओने या संदर्भात ट्रायकडे हे दर कमी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे या प्रणालीच्या माध्यमातून रग्गड कमाई करणार्‍या एयरटेलने दर वाढविण्याची मागणी केली. मात्र ट्रायने ग्राहकांना दिलासा देत जिओच्या मागणीवर सकारत्मक भूमिका घेतली आहे. यामुळे १४ पैशांचा कॉल दर आता कमी होण्याची शक्यता आहे. यात किती घट करण्यात येईल? याची माहिती देण्यात आली नसली तरी याचा थेट लाभ ग्राहकांना होणार आहे. याबाबत ट्राय लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थातच मोबाईलच्या कॉल दरांमध्ये घट होणार आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने सविस्तर आणि सर्वात पहिल्यांदा वृत्त दिले असून ट्रायच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.