शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

खुशखबर! स्वस्त होणार आहेत 4G Smartphone; 10,000 रुपयांपर्यंतची होऊ शकते कपात  

By सिद्धेश जाधव | Updated: January 21, 2022 12:07 IST

4G Smartphone Price In India: यंदा भारतातील 4G स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात होऊ शकते. स्मार्टफोन कंपन्यांच्या निर्णयामुळे ग्राहकांची मोठी बचत होऊ शकते.  

4G Smartphone Price In India: स्मार्टफोन्सचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात ऑनलाईन क्लासेस आणि वर्क फ्रॉम होममुळे अनेक घरांतील स्मार्टफोन्सची संख्या वाढली आहे. जरी सर्व गोष्टी सामान्य झाल्या तरी आता निर्माण झालेली ही मागणी काही प्रमाणात कायम राहू शकते. दुसरीकडे गेल्या वर्षभरात स्मार्टफोन कंपन्यांनी देखील आपल्या मोबाईल्सच्या किंमती मोठ्याप्रमाणावर वाढवल्या आहेत. परंतु यंदा यातून ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.  

भारतातील स्मार्टफोन कंपन्या 4G स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती नवभारत टाइम्सनं दिली आहे. या मागे सर्वात मोठं कारण 5G असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. यंदा देशात 5G कनेक्टिव्हिटीचा शिरकाव होणार आहे. काही दिवसांपूर्वी सर्वप्रथम नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क कनेक्टिव्हिटी  मिळणाऱ्या शहरांची यादी देखील समोर आली होती. त्यामुळे लवकरच 4G स्मार्टफोन्सच्या किंमतीत देखील मोठी कपात केली जाऊ शकते.  

4G स्मार्टफोन्सची संख्या आणि किंमत होणार कमी 

भारतात 5G नेटवर्क लाँच झाल्यावर ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनवर वेगवान इंटरनेटचा वापर करू शकतील. कॉलिंग आणि अन्य सुविधा देखील सुधारतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे 5G स्मार्टफोन्सची मागणी वाढू शकते. याचा परिणाम 4G स्मार्टफोन्सच्या किंमतीवर होऊ शकतो. यात बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोन्स 1,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतात. तर हायएंड स्मार्टफोन्सच्या किंमतीतील कपात 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.  

स्मार्टफोन कंपन्या 4G मोबाईल्सची संख्या देखील कमी करू शकतात. सध्या बाजारात येणारे अनेक मॉडेल्स 5G कनेक्टिव्हिटीसह येत आहेत आणि 5G स्मार्टफोन 4G नेटवर्क देखील चालतो. त्यामुळे कधी कधी थोडे पैसे जास्त देऊन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. अलीकडेच रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं कि, त्यांची कंपनी यंदा अर्ध्या पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन सादर करणार आहे.  

हे देखील वाचा:

लॅपटॉपची कामं करा टॅबलेटवर! 32GB RAM आणि 1TB च्या दमदार स्टोरेजसह Microsoft चे दोन पॉवरफुल टॅब भारतात लाँच; इतकी आहे किंमत

दिवसभर डेटा पुरत नाही? मग या स्मार्टफोन ट्रिक्स मिळवून देतील तुमचा वाया जाणारा मोबाईल डेटा

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान