शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यातून फक्त तीनदा चार्ज करा हा Smartwach; भन्नाट Garmin D2 Mach 1 ची जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: April 2, 2022 15:40 IST

Garmin D2 Mach 1 स्मार्टवॉचमध्ये अनेक हटके फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर Heart Rate सेन्सर आणि SpO2 सेन्सर देखील मिळतात.  

Garmin ही कंपनी आपल्या हटके स्मार्टवॉचसाठी ओळखली जाते. आता पुन्हा कंपनीनं आपल्या स्मार्टवॉच पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीचं Garmin D2 Mach 1 नावाचं वॉच अमेरिकेत सादर करण्यात आलं आहे. यात हार्ट रेट सेन्सर, SpO2 सेन्सर आणि अन्य अनेक हेल्थ फीचर्स मिळतात परंतु 11 दिवसांचा बॅटरी बॅकअप ही याची सर्वात मोठी खासियत म्हणता येईल.  

कंपनीचा दावा आहे की हे वॉच सिंगल चार्जवर 11 दिवस वापरता येईल. म्हणजे महिन्यातून फक्त तीनदा याला चार्जिंग करावी लागेल. हे स्मार्टवॉच पायलट आणि एविएशन प्रोफेशनल्सना लक्षात ठेऊन बनवण्यात आलं आहे. त्यामुळे यात जीपीएस आणि अन्य फीचर्ससह वेदर अलर्ट आणि होरिझॉन्टल सिच्युएशन इंडिकेटर असे फिचर मिळतात.  

Garmin D2 Mach 1 चे फीचर्स 

Garmin D2 Mach 1 मध्ये 1.3 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो अल्वेज ऑन फिचरला सपोर्ट करतो. यात इन बिल्ट जीपीएस देण्यात आलं  आहे. या स्मार्टवॉचमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, ज्यात तुम्ही म्यूजिक फाईल देखील स्टोर करू शकता, म्हणजे कोणत्याही कनेक्शनविना तुम्ही फक्त वॉचचा वापर करून तुमचं आवडीचं संगीत ऐकू शकता.  

या गार्मिन स्मार्टवॉचमध्ये फ्लाईट टाइमिंग ट्रॅक करण्याचं फिचर देण्यात आलं आहे. तसेच फ्लाईट कधी येईल हे देखील अंदाजे सांगितलं जाऊ शकतं. या स्मार्टवॉचमध्ये युजर्सना SpO2 सेन्सर देण्यात आला आहे, जो रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगतो. तर हार्ट रेट सेन्सर हृदयाच्या हालचालींवर लक्ष ठेवतं. यात तुमच्या रोजच्या फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक केल्या जातात.  

Garmin D2 Mach 1 ची किंमत  

Garmin D2 Mach 1 ची किंमत 1199 डॉलर्स पासून सुरु होईल, ही किंमत सुमारे 90 हजार भारतीय रुपयांमध्ये रुपांतरीत होते. कंपनीनं या स्मार्टवॉचचे ऑक्सफोर्ड ब्राऊन लेदर बँड आणि विंटेज टायटेनियम ब्रेसलेट व्हेरिएंट सादर केले आहेत.   

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य