शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक वर्कप्लेस आता डेस्कटॉपवरही उपलब्ध

By शेखर पाटील | Updated: October 27, 2017 11:19 IST

फेसबुकने आपले फेसबुक वर्कप्लेस हे खास कंपन्यांसाठी विकसित केलेले चॅट अ‍ॅप आता डेस्कटॉपसाठीदेखील सादर करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देफेसबुकने एक वर्षापूर्वी वर्कप्लेस हे चॅट अ‍ॅप लाँच केले होते. प्रयोगात्मक अवस्थेत असतांना याला फेसबक अ‍ॅट वर्क असे नाव होते. वर्षानंतर भारतासह जगातील तब्बल ३० हजारांपेक्षा जास्त कंपन्या याचा वापर करत असल्याची अधिकृत माहिती फेसबुकतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

फेसबुकने एक वर्षापूर्वी वर्कप्लेस हे चॅट अ‍ॅप लाँच केले होते. प्रयोगात्मक अवस्थेत असतांना याला फेसबुक अ‍ॅट वर्क असे नाव होते. तथापि, याला नंतर फेसबुक वर्कप्लेस हे नाव देण्यात आले. वर्षानंतर भारतासह जगातील तब्बल ३० हजारांपेक्षा जास्त कंपन्या याचा वापर करत असल्याची अधिकृत माहिती फेसबुकतर्फे जाहीर करण्यात आली आहे. आजवर ही सुविधा फक्त अँड्रॉइड आणि आयओएस या दोन प्रणालींसाठीच सादर करण्यात आली होती. मात्र आता फेसबुक वर्कप्लेस हे संगणकासाठीही उपलब्ध करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थात आता कुणीही आपल्या डेस्कटॉपवरून याचा वापर करू शकेल. याशिवाय यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये स्क्रीन शेअरिंग, ग्रुप व्हिडीओ चॅटींग आणि फाईल शेअरिंगची सुविधा देण्यात आली आहे.

काय आहे फेसबुक वर्कप्लेस ?जगभरातील बहुतांश कंपन्या आपले कर्मचारी हे फेसबुकवर वेळ वाया घालवतात म्हणून चिंताग्रस्त झालेल्या आहेत. यामुळे कंपनी व्यवस्थापनासाठी फेसबुक ही एक प्रकारची डोकेदुखी ठरली आहे. या पार्श्‍वभूमीवर फेसबुकने खास कंपन्यांसाठी फेसबुक वर्कप्लेस ही सेवा सुरू केली आहे. यात सोशल नेटवर्कींगला कार्पोरेट संवादाची जोड देण्यात आली आहे. यात कोणतीही कंपनी वा प्रतिष्ठान आपल्या कर्मचार्‍यांसाठी खास ग्रुप तयार करू शकतात. या माध्यमातून ते आपापल्या कामाशी संबंधीत बाबींना एकमेकांसोबत शेअर करू शकतात. यात इन्स्टंट मॅसेंजर, व्हिडीओ चॅटींग, लाईव्ह स्ट्रीमिंग आदी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. एखाद्या कंपनीचे कर्मचारी याला अंतर्गत कम्युनिकेशनसाठी वापरू शकतात. तर याच्या माध्यमातून दुसर्‍या कंपनीशी संपर्काची सुविधादेखील आहे. विशेष म्हणजे यातील सर्व माहिती ही अत्यंत सुरक्षित असल्याची ग्वाही फेसबुकतर्फे देण्यात आली आहे. एका अर्थाने कोणत्याही कंपनीला या माध्यमातून आपल्या कर्मचार्‍यांसाठी कस्टमाईज्ड सोशल नेटवर्क उभारण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय न्यूज फिडसह यात फेसबुकचे अन्य नियमित फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानFacebookफेसबुक