शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

लावाचा धमाका; मोबाइल न आवडल्यास पैसे परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 04:22 IST

कोणत्याही कारणाने मोबाइल आवडला नाही तर पैसे परत देऊ, अशी घोषणा करत लावा इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने झेड सीरिजचे नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.

नवी दिल्ली : कोणत्याही कारणाने मोबाइल आवडला नाही तर पैसे परत देऊ, अशी घोषणा करत लावा इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने झेड सीरिजचे नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.लावाने झेड६०, झेड७०, झेड८० आणि झेड९० हे चार स्मार्ट दाखल केले असून, त्यात अत्याधुनिक कॅमेरे वापरण्यात आले आहेत.मोबाइल उद्योग क्षेत्रात धमाका करणाºया ‘मनी बॅक चॅलेंज’ योजनेबद्दल माहिती देताना लावा इंटरनॅशनलचे उत्पादन प्रमुख गौरव निगम म्हणाले की, या फोनची निर्मिती येथेच करण्यात आली आहे. गेली आठ वर्षे यासंदर्भात काम सुरू होते. या फोनचा दर्जा एवढा चांगला आहे की आम्ही ग्राहकांसाठी मोबाइल आवडला नाही, तर पैसे परत करण्याचे चॅलेंज निर्माण केले आहे.झेड सीरिजच्या फोनमध्ये मायक्रोसॉफ्ट सॉफ्टकी कीबोर्ड देण्यात आलेला आहे आणि त्यात अनेक भाषांमध्ये टाइप करण्याची सोय आहे. हे फोन अ‍ॅण्ड्रॉइड ७.० नॉगट आॅपरेटिंग सिस्टिमवर चालणारे आहेत.झेड सीरिजचे नवे स्मार्टफोन लाँच करताना लावा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी सुनील रैना आणि स्मार्टफोन प्रमुख दीपक महाजन. मोबाइलमध्ये संशोधन आणि विकास सुरू करून लावा कंपनीने भारतीय मोबाइल उत्पादन क्षेत्रात नवे क्षितिज गाठले आहे. यासाठी लाव्हाचे ७००हून अधिक संशोधक अविरत कार्यरत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल