शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Exclusive : लाईफटाईमसाठी 1000 रुपये मोजले...मग आता पुन्हा 35 रुपये कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 16:25 IST

साधारण 15-16 वर्षांपूर्वी देशात मोबाईल सेवेने बाळसे धरले होते. यावेळी सिमकार्डही सहजासहजी मिळत नव्हते. मिळालेच तर तब्बल 1000 रुपये मोजून लाईफटाईम व्हॅलिडिटी दिली जात होती. अनेकांनी एवढी रक्कम भरून सरकारी दूरसंचार कंपनीसह खासगी कंपन्याची सिमकार्ड घेतली होती. यावेळी इन्कमिंग मोफत दिले जात होते.

मुंबई : साधारण 15-16 वर्षांपूर्वी देशात मोबाईल सेवेने बाळसे धरले होते. यावेळी सिमकार्डही सहजासहजी मिळत नव्हते. मिळालेच तर तब्बल 1000 रुपये मोजून लाईफटाईम व्हॅलिडिटी दिली जात होती. अनेकांनी एवढी रक्कम भरून सरकारी दूरसंचार कंपनीसह खासगी कंपन्याची सिमकार्ड घेतली होती. यावेळी इन्कमिंग मोफत दिले जात होते. मात्र, आता दर महिन्याला 35 रुपयांचे रिचार्ज करण्याची बळजबरी करण्यात येत असून न केल्यास आऊटगोईंगसह इनकमिंगही बंद करण्यात येत आहे. ट्रायने तंबी देऊनही कंपन्या मनमानी कारभार करत आहेत. या लुटीबाबत एका ग्राहकाने आयडीया या टेलिकॉम कंपनीच्या प्रतिनिधीला जाब विचारला. मात्र, त्यांना याबाबतचा खुलासा करता आलेला नाही.

एका ग्राहकाने आयडियाच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी फोन करून चर्चा केली. यावेळी ग्राहकाने त्यांना लाईफटाईम व्हॅलिडीटीच्या सुविधेसाठी 2005 मध्ये 500 आणि 1000 रुपये आकारले होते. या पैशांचे काय झाले याबाबत जाब विचारला. एवढे पैसे घेऊनही आता 35 रुपये का आकारले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी कंपनीच्या प्रतिनिधीने बिनबुडाची उत्तरे देत नवीन नियम आल्याची टेप सुरुच ठेवत उत्तर देण्याचे टाळले. 

या सजग ग्राहकाने मागच्या पैशांचे काय, लाखो ग्राहकांकडून तेव्हा करोडोंनी पैसे गोळा केले त्याचे काय, असा प्रश्न उपस्थित केला. यावर त्या प्रतिनिधीने आमच्याकडे तीन महिन्यांचीच माहिती उपलब्ध असल्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले. तसेच वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसल्याचे सांगत आता 2018 साल सुरु असून तुम्ही 2007 ची माहिती मागत असल्याचे उलट उत्तर दिले. तसेच 35 रुपयाचे रिचार्ज केल्यावरच फोन सेवा सुरु होईल असे सांगितले. यावर ग्राहकाने आयडियामध्ये सिमकार्ड कधी घेतले याबाबत विचारले असता त्यांनी 2003 मध्ये सिम खरेदी केल्याचे मात्र अचूक सांगितले. मग 1000 रुपयांचे रिचार्ज केल्याचे मान्य आहे का असे विचारल्यावर मात्र, त्या प्रतिनिधीने 1000 रुपयांचे रिचार्ज केल्याचे मान्य नसल्याचे सांगत हात झटकले. तसेच तुम्ही आजवर हजारो रिचार्ज केली असतील, आता ते कसे शोधणार असे सौम्य भाषेत सांगत उत्तर देण्याचे टाळले. यावर कंपन्या लुटालूट करत असून आमची माहीतीही लपवत असल्याचा आरोप करत ग्राहक मंचात जावे लागेल असा इशारा या ग्राहकाने दिला. 

 

ग्राहक सेवा प्रतिनिधीला विचारलेला जाब ऐका खालील लिंकवर : 

 

अशा प्रकारे मोबाईल कंपन्या ग्राहकांची लूट करत असून काही वर्षांपूर्वी हजार रुपये खर्चून लाईफटाईम व्हॅलिडिटी घेतली जात असताना आता 35 रुपयांच्या रिचार्जची बळजबरी करण्यात येत आहे. मात्र, आऊटगोईंगसोबत इनकमिंगही बंद करत असल्याने ग्राहकांना नाईलाजाने दर महिन्याला रिचार्ज मारावे लागत आहे. ही ग्राहकांची फसवणूक असून तेव्हाचे मोबाईल सध्याच्या ग्राहकांकडे नसल्याने याचा फायदा कंपन्या घेत आहेत. यामध्ये सरकारी कंपन्याही सहभागी आहेत. 

 

जुने नियम कंपन्यांकडून पायदळीनवीन नियम आल्याचे सांगत जुने नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. कायद्यानुसार जुन्या प्रकरणांना नवीन नियम लागू होत नाहीत. नवीन नियम हे त्यानंतर होणाऱ्या गोष्टींवर लागू होतात. मात्र, कंपन्या याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. यामुळे कंपन्यांचे प्रतिनिधी अर्धवट माहितीच्या आधारे नवीन नियम आल्याचे सांगत जुन्या ग्राहकांना वाऱ्यावर सोडत आहेत. 

लाईफटाईम व्हॅलिडिटी म्हणजे किती? मरेपर्यंत का?लाईफटाईम व्हॅलिडिटी म्हणजे मरेपर्यंत व्हॅलिडिटी नसते. आरटीओ जेव्हा वाहन चालविण्याचा परवाना देते तेव्हा त्याची व्हॅलिडिटी ही 20 वर्षांची असते. अशाच प्रकारे टेलिकॉम कंपन्याही तेव्हा व्हॅलिडिटी देत होत्या. हा काळ 20 ते 30 वर्षांचा होता. 

टॅग्स :IdeaआयडियाBSNLबीएसएनएल