शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अमेझॉनचे किंडल लाईट अ‍ॅप दाखल

By शेखर पाटील | Updated: March 30, 2018 13:34 IST

अमेझॉन कंपनीने अँड्रॉइड युजर्ससाठी आपल्या किंडल या अ‍ॅपची लाईट आवृत्ती सादर करण्यासाठी घोषणा केली असून याला पहिल्यांदा भारतात उपलब्ध करण्यात आले आहे.

टु-जी आणि थ्री-जी नेटवर्कवरील तुलनेत संथ असणार्‍या इंटरनेटच्या युजर्ससाठी अनेक कंपन्यांनी आपापल्या स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्सच्या लाईट आवृत्त्या सादर केल्या आहेत. भारत, इंडोनेशिया, ब्राझीलसारख्या देशातील युजर्सला हे सादर करण्यात आले आहेत. या प्रकारातील अ‍ॅप हे आकारमानाने कमी असते. तसेच ते इंटरनेटचा वेग संथ असतांनाही सहजगत्या चालू शकते. आजवर गुगल, फेसबुक, ट्विटर आदींसह अन्य कंपन्यांनी आपल्या विविध लोकप्रिय अ‍ॅप्सचे लाईट व्हर्जन्स सादर केले आहेत. यात आता अमेझॉन कंपनीच्या किंडल लाईट अ‍ॅपची भर पडणार आहे. अर्थात हे मूळ अ‍ॅपपेक्षा आकारमानाने खूप कमी म्हणजे फक्त २ मेगाबाईट आकाराचे आहे. अर्थात ते सहजगत्या इन्स्टॉल होऊ शकते. तसेच ते खूप वेगवानही आहे. विशेष बाब म्हणजे यात मूळ अ‍ॅपमधील बहुतांश फंक्शन्स उपलब्ध आहेत.

किंडल लाईट अ‍ॅपवर सुमारे पाच दशलक्ष पुस्तकांचा खजिना असून यात इंग्रजीसह हिंदी, मराठी, तामिळ व गुजराती या भारतीय भाषांमधील पुस्तकांचाही समावेश आहे. यावरून कुणीही ई-बुक्स खरेदी करू शकून याला वाचू शकणार आहे. यात इमेज झूमसह फाँट साईज अ‍ॅडजस्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच यात डार्क मोडदेखील दिलेला आहे. यात सुलभ नेव्हिगेशन सिस्टीमही देण्यात आली आहे. यात मूळ अ‍ॅपमधील काही महत्वाचे फिचर्स नसले तरी बेसिक पध्दतीने ई-बुक्सचा आनंद घेता येणार आहे. हे अ‍ॅप खास भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड युजर्ससाठी ते उपलब्ध करण्यात आले आहे.

डाऊनलोड लिंक:-

अमेझॉन किंडल लाईट अ‍ॅप

https://play.google.com/store/apps/details?id=com.amazon.klite&hl=en

टॅग्स :technologyतंत्रज्ञानamazonअॅमेझॉन