शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

फायरफॉक्स ब्राऊजरवर आता लुटा व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा आनंद

By शेखर पाटील | Updated: August 8, 2017 16:52 IST

मोझिलाकच्या फायरफॉक्स ब्राऊजरच्या ताज्या आवृत्तीत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला असून यामुळे कुणीही यावर व्हिआर कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहे.

मोझिलाकच्या फायरफॉक्स ब्राऊजरच्या ताज्या आवृत्तीत व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला असून यामुळे कुणीही यावर व्हिआर कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहे.

मोझिलाने आपल्या फायरफॉक्स ब्राऊजरचे व्हर्जन ५५ जारी केले आहे. यात अनेक नवनवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी अर्थात आभासी सत्येतेचा सपोर्ट होय. ताज्या अपडेटमध्ये ऑक्युलस रिफ्ट आणि एचटीसी व्हाईव्ह या व्हिआर हेडसेटच्या वापराला संलग्न करण्यात आले आहे. अर्थात याला वेबव्हिआरचा सपोर्टदेखील मिळाला असून याच्या मदतीने आभासी सत्यतेत विविध कंटेंटची अनुभुती घेता येणार आहे. आधीच गुगलचे क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज या ब्राऊजरवर व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी देण्यात आला असतांना आता मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरनेही ही सुविधा प्रदान करत या स्पर्धेत उतरण्याची घोषणा केली आहे. वेबवरून व्हिआरची अनुभुती घेण्याच्या प्रमाणात वाढत होत असतांना, आणि खरं तर एकंदरीतच या प्रकारातील कंटेंटच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात वृध्दी होत असतांना मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरने काळाची पावले ओळखत याला संलग्न केल्याचे मानले जात आहे. सध्या फक्त दोन व्हिआर हेडसेटचा सपोर्ट असला तरी येत्या काही दिवसांत अन्य हेडसेटही याच्याशी संलग्न करण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरच्या ताज्या आवृत्तीत स्क्रीनशॉट हे नाविन्यपूर्ण फिचरदेखील देण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही हवा तो स्क्रीनशॉट काढल्यानंतर याला हव्या त्या पध्दतीने संपादीत करून विविध माध्यमातून शेअर करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तसेच नवीन आवृत्तीत सुरक्षाविषयक अनेक त्रुटींना दुरूस्त करण्यात आले आहे. ८ ऑगस्ट रोजी मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरची ५५वी आवृत्ती बीटा अवस्थेत युजर्सला प्रदान करण्यात येत असून येत्या काही दिवसात सर्व वापरकर्त्यांना याला अपडेटच्या स्वरूपात सादर करण्यात येईल असे जाहीर झाले आहे.