शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

विवो व्ही7ची एनर्जेटीक ब्ल्यू आवृत्ती

By शेखर पाटील | Updated: December 18, 2017 14:42 IST

विवो कंपनीने तब्बल २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणार्‍या विवो व्ही ७ या स्मार्टफोनची एनर्जेटीक ब्ल्यू ही नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

विवो कंपनीने तब्बल २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणार्‍या विवो व्ही ७ या स्मार्टफोनची एनर्जेटीक ब्ल्यू ही नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. विवो कंपनीने सप्टेबर महिन्यात विवो व्ही ७ प्लस हा स्मार्टफोन सादर केला होता. याची लघु आवृत्ती नोव्हेंबर महिन्यात विवो व्ही ७ या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली. हे मॉडेल ग्राहकांना १८,९९० रूपयात आणि मॅट ब्लॅक आणि शँपेन गोल्ड या रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले होते. आता याच मॉडेलची एनर्जेटीक ब्ल्यू या नावाने नवीन आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर करण्यात आले आहे. २० डिसेंबरपासून ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करता येणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. याचे मूल्य जाहीर झाले नसले तरी ते आधीच्या मॉडेलइतकेच असण्याची शक्यता आहे.

विवो व्ही ७ या स्मार्टफोनमध्ये एफ/२.० अपार्चर आणि मूनलाईट ग्लो सेल्फी फ्लॅशयुक्त २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा या मॉडेलची खासियत मानली जात आहे. तर याचा मुख्य कॅमेरा एफ/२.० अपार्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर विवो व्ही ७ प्लस या स्मार्टफोनमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१४४० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा २.५ डी आयपीएस इनसेल फुल व्ह्यू १९:९ गुणोत्तर असणारा डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. या मॉडेलमध्ये ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर असून याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे.  

विवो व्ही ७ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर आधारित फनटच ओएस ३.२वर चालणारा असेल. तर यातील बॅटरी ३,००० मिलिअँपिअर क्षमतेची आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट, डिजीटल कंपास आदी सेन्सर्सदेखील असतील. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल