शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा नवा प्लॅन! Jio, Airtel आणि Vi ची होणार सुट्टी! इंटरनेटशिवाय पाहू शकता Netflix, Prime Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 08:27 IST

D2M : सध्या 82 टक्के इंटरनेट ट्रॅफिक व्हिडिओशी संबंधित आहे. भारतात प्रत्येक मिनिटाला सुमारे 1.1 मिलियन मिनिटांचे व्हिडिओ स्ट्रिमिंग किंवा डाउनलोड केले जातात.

नवी दिल्ली : दूरसंचार विभाग (DoT)एका नव्या 'डायरेक्ट टू मोबाईल' (D2M) टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने इंटरनेटशिवाय व्हिडिओ ऑनलाइन पाहता येणार असल्याचा दावा केला जात आहे. म्हणजेच मोबाईल फोनला एफएम (FM) सारखे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसारख्या नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) सारख्या OTT प्लॅटफॉर्मशी इंटरनेटशिवाय थेट कनेक्ट केला जाऊ शकेल. यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

कशी काम करेल D2M टेक्नॉलॉजी?खरंतर, व्हिडिओ आणि इतर इंटरनेट सेवा दूरसंचार विभागाद्वारे निश्चित स्पेक्ट्रम बँडवर जोडल्या जातील. प्रसार भारतीने 'डायरेक्ट-टू-मोबाइल' (D2M) टेक्नॉलॉजीच्या चाचणीसाठी गेल्या वर्षी IIT कानपूरसोबत भागीदारी केली होती. यामध्ये 526-582 मेगाहर्ट्झ बँडचा वापर केला जाऊ शकतो. दूरसंचार विभागाने यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

Jio, Airtel आणि Vi ची सुट्टी होणार का?अशा परिस्थितीत D2M टेक्नॉलॉजी आल्यानंतर रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि व्ही (Vi) सारख्या दूरसंचार कंपन्यांची सुट्टी होणार का? असा प्रश्न उपस्थित होते आहे. मात्र, जिओ, एअरटेल आणि व्ही सारख्या टेलिकॉम कंपन्यांना पूर्णपणे बंद होणार नाहीत. पण, ऑनलाइन व्हिडिओ पाहण्यासाठी  जिओ, एअरटेल आणि व्ही वरील निर्भरता काही प्रमाणात कमी होईल.

व्हिडिओ पाहण्यात भारत अव्वलसध्या 82 टक्के इंटरनेट ट्रॅफिक व्हिडिओशी संबंधित आहे. भारतात प्रत्येक मिनिटाला सुमारे 1.1 मिलियन मिनिटांचे व्हिडिओ स्ट्रिमिंग किंवा डाउनलोड केले जातात. दर महिन्याला अंदाजे 240 टेक्साबाइट डेटा वापरला जातो.

काय होईल फायदा?कन्व्हर्ज्ड डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) नेटवर्कच्या मदतीमुळे बफरिंगशिवाय अनलिमिटेड व्हिडिओ पाहता येतील. यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग आणि दिशा बदलेल. D2M नेटवर्कमध्ये, ब्रॉडकास्टर्स अशा डेटा पाईप्सचा वापर करू शकतात आणि पारंपारिक टीव्हीपेक्षा बरेच अॅप्लिकेशन डिलिव्हर करता येऊ शकते. डायरेक्ट-टू-मोबाइल आणि 5G ब्रॉडबँडमधील समन्वय भारतातील ब्रॉडबँडचा वापर आणि स्पेक्ट्रमच्या उपयोगात सुधारणा होईल.

टॅग्स :Netflixनेटफ्लिक्सamazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञानJioजिओAirtelएअरटेल