शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2024 17:19 IST

टीव्ही, ओटीटी क्षेत्रात नवीन संकल्पना आणण्यात आली आहे. जाणून घ्या...

कोरोनाने अनेक गोष्टी एकदम बदलून टाकल्या. अगदी आपल्या सवयींपासून ते आपल्या धारणांपर्यंत सर्वांना छेद देणाऱ्या गोष्टी घडल्या. अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले. यापैकी एक म्हणजे आपली टीव्ही पाहण्याची पद्धत. स्ट्रिमबॉक्स मीडियाचे अनुज गांधी, मायक्रॉमॅक्सचे राहुल शर्मा आणि आघाडीचे उद्योजक निखिल कामत यांनी एकत्र येऊन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन क्रांती घडवणारी सेवा आणली आहे. एकदा ही सेवा घेतली की, बाकी अन्य कुठे जाण्याची गरज नाही. यामध्ये TV, OTT आणि AI या सगळ्याचा एकाच ठिकाणी मिळतील, अशी सेवा सुरू होत आहे.

स्ट्रिमबॉक्स मीडियाने आणली आहे DOR स्ट्रिमबॉक्स मीडिया DOR नावाची नवीन संकल्प घेऊन आले आहेत. यामध्ये बहुतांश ओटीटी प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी मिळतात. ही भारतातील पहिली सबस्क्रिप्शन टीव्ही सेवा आहे. यासाठी तुम्हाला यांचा टीव्ही घ्यावा लागेल. एकदा टीव्ही घेतला की, २४ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अन्य अॅप तसेच ३०० हून अधिक चॅनल्स एकाच ठिकाणी पाहता येतील किंवा त्याचा अनुभव घेता येऊ शकेल, अशी माहिती देण्यात आली. दोन ते अडीच वर्षांपूर्वी ही संकल्पना डोक्यात आली. यावर काम सुरू केले. त्यानंतर गेल्या वर्षी मायक्रोमॅक्सचे राहुल शर्मा यांची भेट झाली. माझी संकल्पना त्यांना सांगितली. ही संकल्पना दोघांनाही पटली आणि DOR आकारास आली, अशी माहिती स्ट्रिमबॉक्स मीडियाचे अनुज गांधी यांनी या सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात दिली. 

TV ची किंमत, वैशिष्ट्य काय? सबस्क्रिप्शन कितीचे करायचे?

DOR चे टीव्ही ४३ इंच, ५५ इंच आणि ६५ इंच या तीन साइजमध्ये उपलब्ध आहेत. DORने क्यूएलईडी, फोर के अल्ट्रा एचडी, डॉल्बी ऑडिओ विथ फोर्टी वॉट स्पीकर आणि सोलर रिमोट या सर्व सुविधा एकाच टीव्हीत ऑफर केल्या आहेत. ४३ इंची डोर सबस्क्रिप्शन टीव्ही १ डिसेंबर २०२४ पासून फ्लिपकार्टच्या माध्यमातून उपलब्ध असेल. याचे मासिक सबस्क्रिप्शन शुल्क ७९९ रुपये प्रति महिना असून, टीव्हीची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. (यामध्ये आगाऊ अॅक्टिवेशन शुल्क, एका महिन्याचे सबस्क्रिप्शन शुल्क समाविष्ट आहे) ५५ इंची टीव्हीची किंमत १६ हजार ९९९ रुपये असून, व ६५ इंची टीव्हीची किंमत २४ हजार ९९९ रुपेये आहे. परंतु, हे पर्याय २०२५च्या सुरुवातीला उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. केवळ फ्लिपकार्ट नाही, तर अन्य ठिकाणीही हे टीव्ही उपलब्ध केले जाणार आहेत. या टीव्हीसोबत DOR ची विशेष OS देण्यात येते. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानTelevisionटेलिव्हिजनArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स