शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

http आणि https मधील फरक तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 10:31 IST

http (हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल)बरोबर S जोडलेला नसल्यास तुम्ही त्यावरून कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करू नका.

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वापरकर्त्यांचा डेटा चोरीला जात असल्याचा मुद्दा प्रकर्षानं समोर आला आहे. या डेटाचोरीवरून काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते. तसेच फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग यालाही डेटा चोरीप्रकरणी अमेरिकन काँग्रेसनं चांगलंच फैलावर घेतलं होतं. http (हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल)बरोबर S जोडलेला नसल्यास तुम्ही त्यावरून कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करू नका.एचटीटीपी(हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल)बरोबर एस असल्यास तुम्हाला तो सुरक्षेची हमी देतो. तर तुम्ही एखाद्या वेबसाइटला भेट दिली, त्यावेळी वेबसाइटच्या सुरुवातीला http:///. असं दिसल्यास तुम्ही ते संकेतस्थळ तात्काळ बंद करा. कारण त्यामुळे तुमच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो. कदाचित http:///. च्या माध्यमातून तुमच्या कॉम्प्युटरमधील डेटाही हॅकर्स चोरू शकतात. परंतु https:///. तुम्हाला सुरक्षेची खात्री देतो. http:///. वरून सुरू होणा-या एखाद्या वेबसाइटवर तुम्ही एखादा अर्ज भरला असल्यास तुमची माहिती दुसरा कोणी तरी चोरू शकतो. तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्डचे व्यवहारही http:///. वरून करणं शक्यतो टाळा. त्यापेक्षा https:///. वरून व्यवहार करण्याला प्राधान्य द्या. जर एखादी वेबसाइट तुमच्याकडे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा नंबर मागत असेल तर आधी एड्रेस बारवर https:///. पासून साइटला सुरुवात होते का नाही ते पाहा.जर http:///. या एड्रेसबारवरून वेबसाइटला सुरुवात होत असल्यास तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाची माहिती देऊ नका. कोणत्याही वेबसाइटला भेट देण्याआधी domain extension (.com or .org, .co.in, .net  etc) तपासून पाहा. समजा  http://amazon.diwali-festivals.com अशी वेबसाइट असल्यास .comच्या आधीचा शब्द diwali-festivals असा आहे. त्यामुळे हे वेबपेज अॅमेझॉनशी संबंधित नाही. तर ते diwali-festivalsशी निगडीत आहे, असे समजावे. या आधी आपण असे कधीच ऐकले नव्हते. परंतु अशा पद्धतीनं डेटा चोरी होत असल्याच्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.