नवी दिल्ली: दिवाळीचा सण जवळ आला असून, यानिमित्ताने ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर्सची घोषणा केली आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यांसारख्या प्लॅटफॉर्मवर ॲपल, सॅमसंग, गुगल आणि मोटोरोलाच्या प्रीमियम स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे.
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच ईएमआयद्वारे हे मोबाईल परवडणाऱ्या हप्त्यांमध्ये घेता येणार आहेत. परंतू, यासाठी तुमच्याकडे त्या बँकेचे कार्ड असणे गरजेचे आहे. यावर १० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंटही मिळत आहे. तुमच्या बजेटनुसार खाली काही स्मार्टफोन देण्यात आले आहेत.
फ्लिपकार्टवर ऑफर्सचा पाऊस
Apple iPhone 16: ज्याची मूळ किंमत ₹७९,९०० आहे, तो आता केवळ ₹५४,९९९ मध्ये उपलब्ध आहे.
Apple iPhone 16 Pro Max: १,४४,९०० रुपयांचा हा प्रीमियम फोन तब्बल ४२,००० रुपयांच्या डिस्काउंटनंतर ₹१,०२,९९९ ला मिळत आहे.
Samsung Galaxy S24 FE: सॅमसंगचा हा लोकप्रिय फोन ₹५९,९९९ ऐवजी फक्त ₹२९,९९९ मध्ये खरेदी करता येईल.
Google Pixel 9 Pro Fold: गुगलचा फोल्डेबल फोन, ज्याची किंमत ₹१,७२,९९९ आहे, तो सेलमध्ये ₹८४,९९९ ला उपलब्ध आहे.
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल
Samsung Galaxy S24 Ultra 5G: १,३४,९९९ रुपयांचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन आता केवळ ₹७३,९९९ मध्ये तुमचा होऊ शकतो.
Samsung Galaxy A55 5G: बजेट स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्यांसाठी, हा फोन ₹४२,९९९ ऐवजी ₹२३,९९९ मध्ये उपलब्ध आहे.
Motorola Razer 50 Ultra: मोटोरोलाचा स्टायलिश फोल्डेबल फोन ₹१,१९,००० वरून थेट ₹५५,२४९ पर्यंत खाली आला आहे.
Motorola Edge 50 Ultra 5G: हा दमदार स्मार्टफोन ₹६४,९९९ ऐवजी ₹४४,९९९ मध्ये मिळत आहे.
Web Summary : Diwali sales offer huge discounts on smartphones from Apple, Samsung, Google, and Motorola on Flipkart and Amazon. Attractive EMI options and bank offers further sweeten deals. Top deals include iPhone 16 at ₹54,999 and Samsung Galaxy S24 Ultra 5G at ₹73,999.
Web Summary : दिवाली सेल में फ्लिपकार्ट और अमेज़न पर Apple, Samsung, Google और Motorola के स्मार्टफोन्स पर भारी छूट मिल रही है। आकर्षक ईएमआई विकल्प और बैंक ऑफर सौदों को और भी बेहतर बनाते हैं। प्रमुख डील्स में iPhone 16 ₹54,999 और Samsung Galaxy S24 Ultra 5G ₹73,999 में शामिल हैं।