शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल डिटॉक्स : तुमची मुले फोनवर काय काय बघतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 08:54 IST

Digital Detox: गुगलचे डिजिटल वेलबीइंगचे प्रयत्नही अतिशय इंटरेस्टिंग आहेत. wellbeing.google.com या साइटवर गेलात, तर तिथे आपले आयुष्य आणि टेक्नॉलॉजी याचा समतोल कसा साधता येईल याची भरपूर माहिती मिळू शकते.

- मुक्ता चैतन्य, समाज माध्यमाच्या अभ्यासक

कोरोनाच्या आधीपासून आपल्या मुलांच्या हातात त्यांचे किंवा पालकांचे फोन आहेत. कोरोनानंतर मुलांचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढलेला आहे, हेही आपल्याला माहीत आहे. मोठ्यांच्या फोनमध्ये अनेक गोष्टी असतात. व्हॉटस्‌ॲपवरून आलेले चावट मिम्स, सेक्स जोक्स, पॉर्न क्लिप्स, कुठेतरी दंगल किंवा हिंसाचार झाला असेल, तर त्याचे फोटो, व्हिडिओ, राजकीय कार्टुन्स किंवा मॉर्फ केलेले फोटो व्हिडिओ आणि अनंत गोष्टी. मोठ्यांचे जग जे वाचते, बघते, ऐकते ती प्रत्येक गोष्ट लहान मुलांसाठी नसते.

सगळा कन्टेन्ट मुलांनी बघण्या-वाचण्यालायक असतोच असे नाही; पण जेव्हा मोठ्यांचे फोन लहान मुलांच्या हातात जातात तेव्हा लहानांसाठी नसलेले मोठ्यांचे जग अचानक त्यांच्या पुढ्यात उघडते आणि ज्या कन्टेन्टचा ते ग्राहकच नाहीत तोही कन्टेन्ट ते बघायला, वाचायला, ऐकायला लागतात. म्हणूनच पेरेंटल कंट्रोल्स वापरणे गरजेचे आहे.

आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये पेरेंटल कंट्रोल असा पर्याय असतो. तो चालू केला की काय- काय घडते ते बघूया. १) तुम्ही जर कुठले फॅमिली लिंक ॲप वापरत असाल, तर तुमच्या मुलांच्या वापरावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवता येते. २) पेरेंटल कंट्रोल्स चालू केले की, आपले मूल आपला फोन किती वापरतेय हे समजू शकते. ३) मुलांचा आपल्या फोनवरचा स्क्रीन टाइम किती आहे, गुगलच्या कुठल्या गोष्टी त्यांनी बघितल्या, हे समजू शकते. ४) त्यांनी कुठल्या साइटस्‌ वापरायच्या नाहीत हे पालकांना ठरवता येते. ५) मुले जर पालकांचा फोन वापरत असतील, तर त्यांच्या डिजिटल फूटप्रिंटन्सवर लक्ष ठेवता येते. 

याखेरीज काही डिजिटल वेलबीइंग ॲप्सदेखील आज उपलब्ध आहेत. जसे की आपण आपल्या फोनचे स्क्रीन लॉक किती वेळा उघडतो हे जाणून घेण्यासाठी ॲप आहे. स्क्रीन वेळ कसा कमी करता येईल, याचा विचार आपण करू शकतो. गुगलचे डिजिटल वेलबीइंगचे प्रयत्नही अतिशय इंटरेस्टिंग आहेत. wellbeing.google.com या साइटवर गेलात, तर तिथे आपले आयुष्य आणि टेक्नॉलॉजी याचा समतोल कसा साधता येईल याची भरपूर माहिती मिळू शकते. अनेक ॲप्सची माहितीही या साइटवर उपलब्ध आहे, जी वापरून तुम्ही तुमचा स्क्रीन टाइमही कमी करू शकता आणि डिजिटल आयुष्यावर ताबाही ठेवू शकता.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान