शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची मोठी कारवाई! 6 लाख मोबाईल क्रमांक बंद होणार? कंपन्यांना दिला 'हा' आदेश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 15:08 IST

वाढत्या सायबर/ मोबाईलद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Department of Telecommunications : गेल्या काही काळापासून बनावट मोबाईल क्रमांकाच्या मदतीने गुन्हे वाढत असल्यामुळे दूरसंचार विभागाने (DoT) मोबाइल कंपन्यांना (टेलिकॉम ऑपरेटर) सुमारे 6 लाख 80 हजार मोबाइल कनेक्शनची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हे कनेक्शन चुकीच्या किंवा बनावट ओळखपत्रांच्या आधारे घेतले गेले असावेत. दूरसंचार विभागाने मोबाईल कंपन्यांना तपासणीसाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. 60 दिवसांत कंपन्यांनी चौकशी न केल्यास, हे संशयास्पद मोबाइल क्रमांक बंद करण्यात येतील, असेही विभागाने म्हटले आहे.

फसवणूक वाढलीफोनवरील फसवणूक खूप वाढली आहे, त्यामुळे दूरसंचार विभागाचे हे पाऊल आवश्यक आहे. विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने असे संशयास्पद क्रमांक शोधले आहेत. दूरसंचार विभागाचे म्हणणे आहे की, विविध विभागांसोबत एकत्र काम करणे आणि फसवे कनेक्शन पकडण्यासाठी एआयचा वापर करणे खूप महत्वाचे आहे. 

गेल्या आठवड्यात 1.7 कोटीहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद दूरसंचार विभागाने सांगितले की, त्यांनी गेल्या आठवड्यात 1.7 कोटींहून अधिक बनावट मोबाइल कनेक्शन बंद केले आहेत. यातील सुमारे 0.19 लाख मोबाइल फोन सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले होते. विभागाला संचार साथी पोर्टलवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच, गृह मंत्रालय आणि बँका, यांसारख्या महत्त्वाच्या विभागांकडूनही माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. विभागाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आतापर्यंत 1.34 अब्ज मोबाइल कनेक्शन तपासले आहेत.

Chakshu Portal तक्रार करू शकतासरकारने 'Chakshu Portal' हे आणखी एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्ही फोन कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद संदेशाची तक्रार करू शकता. आकडेवारीनुसार, आतापर्यंत दूरसंचार विभागाकडे 28412 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनfraudधोकेबाजी