शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

Data: तुमच्या डेटाला पाय फुटू नये म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 11:50 IST

Data protect: आजच्या युगात डेटा हे नवीन इंधन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे डेटा प्रायव्हसीबाबत कंपन्या संवेदनशील असतात. त्यामानाने ग्राहक मात्र तितकासा जागरूक नसतो; परंतु, अलीकडच्या काळात डेटाच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढू लागली आहे. आपला डेटा सुरक्षित राहावा, यासाठी काय करता येईल?

- ॲड. (डॉ.) प्रशांत माळी(सायबरतज्ज्ञ वकील) 

डेटा हा आजच्या युगातील ही खूप मोठी संपत्ती आहे व त्याचा वापर हा विविध क्षेत्रांत केला जातो. जसे की, राजनैतिक निवडणूक जिंकण्यासाठी किंवा तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी.  तुमचा डेटा हा खूप सहजरीत्या लीक होऊ शकतो. डेटा लीक म्हणजे संवेदनशील डेटा योगायोगाने किंवा जाणूनबुजून भौतिकरीत्या, इंटरनेटवर किंवा कोणत्याही इतर स्वरूपात उघड होणे. 

जसे की हरवलेले हार्ड ड्राइव्ह किंवा लॅपटॉप, या संवेदनशील डेटामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, जसे की तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल आयडी, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर, बँक अकाऊंट नंबर इत्यादी माहिती तुमच्या परवानगीशिवाय इतर व्यक्तींच्या हाती जाऊ शकते. या सगळ्या डेटाच्या डेटावरून एक नवीन डेटा बनवला जातो. ॲडटेक कंपन्या या डेटाचा वापर करून तुमच्या आवडीच्या अशा विविध गोष्टी तुम्हाला दाखवायला लागते.  तुमच्या मनातले इंटरनेटने ओळखले व लगेच तेच समोर दिसले  असे तुम्हाला वाटते. तुमच्या मनातील गोष्टीत इंटरनेटवर दिसत असतात  हा योगायोग नसून, तुमच्या डेटापासूनच बनवलेला नवीन डेटा असतो जो तुमच्या आचार-विचार तुमच्या आवडीनिवडी यांवर ताबा करत असतो. 

अनेक प्रकारे डेटा लीक कळत म्हणजे जे तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट किंवा फोटो अपलोड करता, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडियावर पोस्ट करून किंवा नवीन ॲप डाउनलोड केल्यावर ‘आय अग्री’ बटण प्रेस करता, गुगल सर्च वरून तुमचा शोधण्याचा पॅटर्न  बघितला जातो.  तुमचे गुगलचे लोकेशन ऑन  असते, किंवा तुमचा डेटा बँकमधून लीक झाला, झोमॅटोसारख्या कंपनीचा डेटा लीक झाला असेल तर तेथून तुमचा पण डेटा लीक होऊ शकतो.  

माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हे करा-  तुमचा पासवर्ड दुर्बल असू नयेत आणि तुमचे पासवर्ड एकाच वेळी अनेक ठिकाणी वापरणे टाळा.- फिशिंग घोटाळ्यांमध्ये फसणे टाळा. ईमेल किंवा एसएमएसद्वारे येणाऱ्या लिंक्सवर क्लिक करू नका आणि तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका.- सार्वजनिक वायफाय नेटवर्क वापरताना VPN वापरा.- तुमच्या डिव्हाइसवर एक चांगला अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर स्थापित करा आणि नियमितपणे अपडेट करा.

माहितीचा डेटा लीक झाल्यास हे करा- तुमच्या बँक आणि क्रेडिट कार्ड कंपनींशी संपर्क साधा आणि तुमच्या अकाऊंट्सची सुरक्षा तपासा.- तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्स आणि ऑनलाइन खरेदी खात्यांचे पासवर्ड बदला.-तुमच्या वैयक्तिक माहितीची निगराणी ठेवण्यासाठी एक आयडेंटिटी थेफ्ट प्रोटेक्शन सेवा वापरा.- डेटा लीक एक गंभीर समस्या आहे, परंतु तुम्ही काही सावधगिरी बाळगून वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवू शकता.-तुमचा डेटा लीक झाल्यास तुमच्याकडे दिवाणी व फौजदारी अशा दोन प्रकारे गुन्हा नोंदवायचे पर्याय आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइम