शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

ज्यांच्या घरी wifi आहे, त्यांनी हा लेख आवर्जून वाचावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 15:26 IST

क्रेडिट-डेबिट कार्डच्या पिन नंबरचा गैरवापर, मोबाइल-इंटरनेट बँकिंगद्वारे होणारी फसवाफसवी, अशी प्रकरणं अगदी रोजच्या रोज समोर येत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत सावधपणे करणं गरजेचं झालंय. 

तंत्रज्ञानाच्या, कॉम्प्युटर-इंटरनेटच्या वापरामुळे अनेक कामं एका क्लिकवर होऊ लागली आहेत. पण दुसरीकडे, सायबर क्राइमच्या घटनाही वाढताहेत. क्रेडिट-डेबिट कार्डच्या पिन नंबरचा गैरवापर, मोबाइल-इंटरनेट बँकिंगद्वारे होणारी फसवाफसवी, अशी प्रकरणं अगदी रोजच्या रोज समोर येत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत सावधपणे करणं गरजेचं झालंय. 

आज अनेक घरांमध्ये वाय-फाय असतं. या वाय-फायची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे आणि त्यात हयगय झाल्यास काय होऊ शकतं, याबद्दल सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट कविता दातार यांनी लिहिलेला एक लेख सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आपल्या वाय-फायचा पासवर्ड कुणाला दिला नाही, म्हणजे ते सुरक्षित आहे, असा आपला समज असतो. पण, हा लेख आपल्याला खडबडून जागं करणारा आहे.

..........

माधवीने आणलेल्या गरम चहाचा घोट घेत विजयने आताच आलेले ताजे वर्तमानपत्र उघडले. आज रविवार असल्यामुळे ऑफिसला जाण्याची गडबड नव्हती. माधवी स्वयंपाकघरात पोह्यांसाठी कांदा चिरत होती. 

विजय एक बडा सरकारी अधिकारी. रिटायरमेंटला अजून दोन वर्षे बाकी होती. माधवी गृहिणी, पण वर्षभरापासून मुलगी जान्हवी लग्न होऊन अमेरिकेत आणि मुलगा निखील नोकरी निमित्त बेंगलोरला असल्यामुळे ती आपला बराचसा वेळ एका संस्थेच्या समाजकार्यासाठी देत होती. 

विजयने पेपरचे पान उलटले आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्याने उठून दार उघडले. दारात तीन व्यक्ती उभ्या होत्या. "कोण हवंय आपल्याला?" विजयने विचारले, "मी इन्स्पेक्टर शिंदे, हे आमचे सायबर क्राइम सेल ऑफिसर दीक्षित आणि हे हवालदार कदम" इन्स्पेक्टर शिंदेंनी दोघांकडे निर्देश करत सांगितले. "काय झालंय इन्स्पेक्टर?" प्रश्नांकित चेहरा करून विजयने विचारले. एव्हाना माधवी बाहेर आली होती. "तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला चौकशीसाठी यावे लागेल." इन्स्पेक्टर म्हणाले. "का? काय झाले?" विजयने विचारले. "दिल्लीच्या एका व्यापाऱ्याच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून काही परदेशी शॉपिंग साईट्सवरून ऑनलाईन खरेदी करण्यात आली आहे सुमारे साडेचार लाखांची." इन्स्पेक्टरने माहिती दिली. "पण यांत माझा काय संबंध?" विजयला कळत नव्हते की इन्स्पेक्टर हे सगळं आपल्याला का सांगताहेत. विजय आणि माधवी दोघेही गोंधळलेल्या चेहऱ्याने त्या तिघांकडे आलटून पालटून पाहत होते. "तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल कारण यांत तुमच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला आहे. आणि हा एरिया आमच्या पोलिस स्टेशनच्या अखत्यारीत येत असल्याने दिल्ली पोलिसांनी ही कम्प्लेंट आम्हाला वर्ग केली आहे." दीक्षितांनी पुस्ती जोडली. विजय आणि माधवी दोघांच्या पायांखालची जमीन सरकल्या सारखी झाली. काय करावं, काय प्रतिक्रिया द्यावी, त्यांना कळेना. त्याही अवस्थेत विजय माधवीला धीर देत म्हणाला, "मी जाऊन येतो, बघतो काय झाले आहे ते. काळजी करू नकोस." आणि तो त्या तिघांबरोबर बाहेर पडला. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर शिंदे आणि सायबर सेल ऑफिसर दीक्षित या दोघांसमोर विजय बसला होता. 

दीक्षितांनी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारच्या रात्री एक दीड वाजेच्या सुमारास त्याचे वायफाय नेटवर्क वापरून दिल्लीच्या आलोक शर्मा या व्यापाराच्या डेबिट कार्डचा गैरवापर करून पाच सहा विदेशी शॉपिंग साइट्सवरून ऑनलाइन खरेदी करण्यात आली होती. वायफाय नेटवर्क त्याच्या नावे असल्याने या प्रकाराला तोच नैतिक जबाबदार ठरत होता. "हे कसे शक्य आहे आमच्या घरी फक्त मी आणि माझी पत्नी असे दोघेच असतो आणि रात्री साडेनऊला तर आमची निजानीज झालेली असते. त्या दिवशी आमच्याकडे कोणी आलेलेही नव्हते, मग... " "मिस्टर विजय जोशी.." त्याला मध्येच तोडत दीक्षित म्हणाले, "आम्हाला कळतंय की हे काम तुमचे नाही. " त्यानंतर दीक्षितांनी हा सर्व प्रकार विजयला कळेल अशा सविस्तरपणे समजावून सांगितला. 

या प्रकाराला वॉर ड्रायव्हिंग असे म्हणतात. यात सायबर गुन्हेगार कार किंवा कुठलेही वाहन घेऊन रात्री बाहेर पडतात. सोबत लॅपटॉप किंवा कुठलेही स्मार्ट डिव्हाइस ठेवतात. त्यावर एअरक्रॅक सारखे सॉफ्टवेअर आणि वायरलेस अॅडाप्टर, वायफाय पासवर्ड क्रॅक करण्यासाठी लावलेले असते. एकदा का स्ट्राँग सिग्नलचे वायफाय नेटवर्क मिळाले आणि त्याचा पासवर्ड क्रॅक झाला, की ते वायफाय नेटवर्क वापरण्यासाठी उपलब्ध होते. ते वापरून सायबर गुन्हेगारी कारवाया केल्या जातात. हे गुन्हेगार स्वतःचा ट्रेस लागू न देण्यासाठी एक खास प्रकारचे ब्राउझर वापरतात त्यामुळे ते सहजासहजी पकडले जात नाहीत. मात्र ज्याच्या वाय फाय नेटवर्कचा वापर केला गेला असेल ती व्यक्ती संकटात येऊ शकते. विजयच्या केसमध्ये नेमके हेच झाले होते. स्ट्राँग पासवर्ड आणि फारसे सिक्युअर्ड वायफाय नेटवर्क नसल्याने हे घडले होते. बिचाऱ्याची काही चूक नसताना तो नाहक गोवला गेला होता. थोडासा निष्काळजीपणा त्यांच्या अंगलट आला होता. दोन महिने खटला चालला. विजयवर डेबिट कार्डच्या गैरवापराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही पण त्याला वायफाय नेटवर्कच्या बेजबाबदार वापराबद्दल दंडाची मोठी रक्कम भरावी लागली. दरम्यान काही दिवस त्याला नोकरीतून निलंबित राहावे लागले. 

मित्र मैत्रिणींनो तुमच्यापैकी बहुतेक जण घरात वायफाय नेटवर्क वापरत असाल तर काही नियम जरूर पाळा, तुमच्या वायफाय नेटवर्क सर्व्हिस इंजिनीअरला सांगून WPA इन्क्रिप्शनचा वापर करा. स्ट्राँग पासवर्ड लावा. शक्यतो रात्री किंवा वायफाय वापरांत नसल्यास राऊटर बंद करून ठेवा. घरातले नेहमीच्या वापरातले लॅपटॉप, स्मार्ट डिव्हाइसेस फक्त तुमच्या वायफाय नेटवर्कचा वापर करू शकतील, अनोळखी डिव्हायसेसला वायफाय नेटवर्क स्वीकारणार नाही, अशी सेटिंगसुद्धा तुम्ही करू शकता. तर सावध आणि सजग राहून टेक्नॉलॉजीचा आनंद घ्या.

टॅग्स :WiFiवायफायcyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञान