शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

कुलपॅडचा ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: May 3, 2018 12:52 IST

कुलपॅड कंपनीने ड्युअल सेल्फी कॅमेर्‍यांचा समावेश असणारा कुलपॅड नोट ६ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.

अलीकडच्या काळात अनेक स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला असतो. तर मोजक्या मॉडेल्समध्ये पुढील बाजूसही ही सुविधा दिलेली असते. या पार्श्‍वभूमिवर, कुलपॅड नोट ६ या मॉडेलमध्येही याच प्रकारचे म्हणजेच ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांचे फिचर देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत ८ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असून यांच्या मदतीने अतिशय सजीव वाटणार्‍या सेल्फी प्रतिमा काढता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यासाठी १२० अंशाचा व्ह्यू देण्यात आल्यामुळे या प्रतिमा विस्तृत क्षेत्रातील असणार आहेत. एकंदरीत पाहता सेल्फी प्रेमींसाठी हे फिचर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर याच्या मागील बाजूस एफ/२.२ अपार्चरयुक्त एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस या प्रणालींनी सज्ज असणारा १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

कुलपॅड नोट ६ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ४ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेजसाठी ३२ आणि ६४ जीबी असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यामध्ये ४०७० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर ३५० तासांचा स्टँडबाय टाईम मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कुलपॅड नोट ६ या मॉडेलच्या ३२ जीबी व्हेरियंटचे मूल्य ८,९९० तर ६४ जीबी व्हेरियंटचे मूल्य ९,९९९ रूपये आहे. हे मॉडेल ग्राहकांना ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान