शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ड्युअल कॅमेर्‍यांनी युक्त कुलपॅडचा नवीन स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: July 27, 2018 15:29 IST

फिंगरप्रिंट स्कॅनर असून यामध्ये २८४० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे.

कुलपॅड कूल प्ले ७ हा ड्युअल कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा स्मार्टफोन आता बाजारपेठेत उपलब्ध होणार असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. कुलपॅड कंपनीने गेल्या वर्षी कूल प्ले ६ हे मॉडेल बाजारपेठेत सादर केले असून याला ग्राहकांचा बर्‍यापैकी प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमीवर याचीच पुढील आवृत्ती कूल प्ले ७ या मॉडेलच्या माध्यमातून आता बाजारपेठेत उतारण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात आधीच्या आवृत्तीपेक्षा अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला असून यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ड्युअल कॅमेर्‍यांचा समावेश होय. 

या मॉडेलच्या मागील बाजूस प्रत्येकी १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असणार आहे. यांच्या मदतीने अगदी सजीव वाटणार्‍या प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असणार आहे. याच्याच मदतीने फेस अनलॉक फिचर वापरता येणार आहे. याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर असून यामध्ये २८४० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, कुलपॅड कूल प्ले ७ या मॉडेलमध्ये ५.८५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२२८० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा व १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे.  यामध्ये मीडियाटेकचा एमटी ६७५० हा प्रोसेसर असेल. याची रॅम ४ जीबी व इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. पहिल्यांदा हा स्मार्टफोन चीनी ग्राहकांना सादर करण्यात आला असला तरी लवकरच याला भारतातही लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान