शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

AI समिटमध्ये 'कोल्ड वॉर'! मोदींसमोरच ऑल्टमॅन आणि अमोदेई यांचा हात पकडण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:57 IST

Delhi AI Summit 2026: दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सॅम ऑल्टमॅन आणि डारियो अमोदेई यांच्यातील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. एकमेकांचा हात धरण्यास नकार दिल्याने व्हिडिओ व्हायरल.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या 'इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये एक अत्यंत विचित्र आणि चर्चास्पद क्षण पाहायला मिळाला. जगातील दोन सर्वात मोठ्या AI कंपन्यांचे प्रमुख—ओपन-एआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन आणि अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोदेई हे एकाच मंचावर आले खरे, पण त्यांच्यातील व्यावसायिक वैमनस्य कॅमेरासमोर लपून राहिले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर मंचावर उपस्थित असलेल्या जागतिक टेक लीडर्सचा एक ग्रुप फोटो काढला जाणार होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या दोन्ही बाजूला असलेल्या सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमॅन यांचे हात हातात घेऊन ते हवेत उंचावले. परंपरेनुसार मंचावरील सर्वांनी एकमेकांचे हात पकडून एकतेचा संदेश देणे अपेक्षित होते. मात्र, सॅम ऑल्टमॅन आणि त्यांच्या शेजारी उभे असलेले डारियो अमोदेई यांनी एकमेकांचा हात पकडण्यास नकार दिला. एकमेकांचे हात धरण्याऐवजी दोघांनीही स्वतंत्रपणे आपल्या मुठी हवेत उंचावल्या. या 'ऑकवर्ड' क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, याला 'AI वर्ल्डमधील कोल्ड वॉर' म्हटले जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी देखील काही क्षण या प्रकाराकडे पाहत होते.

या संघर्षाची मुळे जुनीच!डारियो अमोदेई हे एकेकाळी सॅम ऑल्टमॅन यांच्या ओपन-एआयमध्येच 'व्हाईस प्रेसिडेंट ऑफ रिसर्च' म्हणून कार्यरत होते. मात्र, २०२१ मध्ये सॅम ऑल्टमॅन यांच्या कार्यपद्धतीवर आणि 'AI सुरक्षे'च्या मुद्द्यावरून त्यांचे मतभेद झाले. अमोदेई यांनी ओपन-एआय सोडून आपली स्वतःची 'अँथ्रोपिक' ही कंपनी स्थापन केली. आज अमोदेई यांची 'क्लोड' ही चॅटबॉट सिस्टीम ऑल्टमॅन यांच्या 'चॅटजीपीटी'ला तगडी टक्कर देत आहे. दिल्लीतील या परिषदेत एकाच मंचावर येऊनही या दोन दिग्गजांमधील तणाव कमी झालेला नाही, हेच या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सNarendra Modiनरेंद्र मोदी