शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी एक स्मार्टफोन अन् तीन इअर बड्स; मोठ्या तयारीत येतेय ही कंपनी... कधी आहे लाँचिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:32 IST

Nothing: नथिंग फोन ३ सिरीजचे दोन फोन नुकतेच लाँच केलेले आहेत. अशातच आता सीएमएफच्या नावाखाली आणखी एक फोन  CMF Phone 2 Pro आणण्याची तयारी सुरु केली आहे. 

नथिंग या युरोपियन कंपनीचा ब्रँड असलेला सीएमएफ बऱ्याच काळाने नवीन फोन घेऊन येत आहे. नथिंगने यापूर्वी नथिंग फोन २ आणि ३ सिरीज लाँच केलेली आहे. नथिंग फोन ३ सिरीजचे दोन फोन नुकतेच लाँच केलेले आहेत. अशातच आता सीएमएफच्या नावाखाली आणखी एक फोन  CMF Phone 2 Pro आणण्याची तयारी सुरु केली आहे. 

Nothing Phone 3a and Pro news: नेहमीच्या स्मार्टफोनना कंटाळलात? वेगळे काहीतरी हवेय? युआय, कॅमेरा सेटअप आणि ट्रान्स्परंट नथिंग ; फोन ३ए, ३ए प्रो कसे वाटले?

सीएमएफ फोन २ प्रोचा हा फोन एप्रिलच्या अखेरीस लाँच होणार आहे. याची अपेक्षित किंमत २२००० रुपये असण्याचा अंदाज आहे. २८ एप्रिलला सायंकाळी साडे सहा वाजता हा फोन लाँच केला जाईल. याचबरोबर सीएमएफ बड्स २, बड्स २ ए आणि बड्स २ प्लस असे तीन इअर बड्स देखील यावेळी लाँच केले जाणार आहेत. 

यानंतर स्मार्टफोन बाजारात नथिंगचे तीन फोन आणि तीन बड्स असणार आहेत. नथिंगला इअर बड्समध्ये विस्तार करण्याचा विचार दिसत आहे. परडवडणाऱ्या किंमतीतील हा मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन असणार आहे. यामध्ये FHD+ AMOLED डिस्प्ले, मेडियाटेक डायमेन्सिटी ७४०० चिपसेट आणि ८/256 GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे. 

iPhone 16e Review: अ‍ॅपल भारतात तगडी प्लॅनिंग करतेय, उर्दूसह १० भाषांत आणलाय iPhone; बॅटरी तर एवढी जबरदस्त दिलीय...

यामध्ये ट्रिपल कॅमेरा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टिझरमध्ये तसे दिसले आहे. यापैकी एक ५० मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स असू शकते. तसेच ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. सीएमएफचा यापूर्वी फोन १ आला होता, त्याची किंमत १४९९९ रुपये ठेवण्यात आली होती. आता फोन २ ऐवजी प्रो असे नामकरण करण्यात आले आहे. 

नथिंगच्या नावावर सध्या दोन नथिंग फोन ३ आणि ३ ए बाजारात आहेत. या फोनची किंमत अनुक्रमे २४९९९ ते ३४९९९ पर्यंत आहे. या किंमतीपेक्षा कमी किंमतीत सीएमएफचा नवा फोन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन