शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

चीनी DeepSeek Ai ने उडवली झोप; ChatGPT आणि Google Gemini ला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 20:48 IST

चीनी स्टार्टअप कंपनीने आपले Ai मॉडेल लॉन्च करुन अमेरिकन कंपन्यांचे टेंशन वाढवले ​​आहे.

DeepSeek Lab R1 AI : जगात आघाडीवर राहण्यासाठी चीन आणि अमेरिकेत अनेकदा तगडी स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येक क्षेत्रात एकमेकांना मागे टाकण्यासाठी दोन्ही देश आतुरलेले असतात. दरम्यान, आता चीननेतंत्रज्ञान विश्वात खळबळ माजवली आहे. यामुळे सिलिकॉन व्हॅली पूर्णपणे हादरली असून, गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या तंत्रज्ञान कंपन्या तणावात आल्या आहेत. चायनीज कंपनी DeepSeek Lab ने R1 AI मॉडेल लॉन्च केले आहे, जे सध्या जगभरात खूप लोकप्रिय होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात ते ChatGPT, Google Gemini सारख्या AI ला मागे टाकत आहे.

OpenAI ने 2022 मध्ये ChatGPT लॉन्च केले, तेव्हा या जनरेटिव्ह AI ची जगभरात चर्चा होऊ लागली. मायक्रोसॉफ्टच्या या एआय टूलमुळे गुगल, अॅपल आणि मेटासारख्या बड्या कंपन्यांचे टेन्शन वाढले होते. ChatGPT आल्यानंतर या कंपन्यांनी त्यांचे जनरेटिव्ह एआय मॉडेल लॉन्च केले, ज्यांचे दोन वर्षांत लाखो युजर्स झाले. आता चीनी कंपनीच्या नव्या एआय मॉडेलने सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांना चिंतेत टाकले आहे. 

सिलिकॉन व्हॅलीमध्ये खळबळ मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी चीनी स्टार्टअप कंपनी DeepSeek च्या नवीन एआय मॉडेलवर भाष्य केले आहे. सत्या नडेला म्हणाले की, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तर, पर्पलेक्सिटीचे सीईओ अरविंद श्रीनिवास म्हणाले की, ओ1 मिनीची प्रतिकृती बनवून, डीपसीकने प्रभावीपणे ओपन सोर्स बनवले आहे. दरम्यान, हे AI मॉडेल चर्चेत आहे कारण म्हणजे, त्याचे तंत्रज्ञान स्वस्त आहे. 

डीपसीक एआय म्हणजे काय?हे एआय टूल प्रगत भाषेवर काम करते, ज्यामध्ये हायब्रीड आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे. पण, R1 हे कंपनीचे पहिले AI मॉडेल नाही. कंपनीच्या AI मॉडेलची ही तिसरी आवृत्ती म्हणजेच V3 आहे. DeepSeek चे मुख्यालय चीनच्या Hangzhou शहरात असून, ही कंपनी 2023 मध्ये लिआंग वेनफेंग यांनी स्टार्टअप म्हणून सुरू केली होती. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजेच AGI विकसित करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

कमी खर्चात तयारDeepSeek R1 च्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे त्याची परवडणारी किंमत. सोप्या भाषेत समजून घेतल्यास, हे AI मॉडेल अमेरिकन AI मॉडेलपेक्षा खूपच स्वस्त आहे. ओपन AI o1 ची ​​किंमत $15 प्रति मिलियन इनपुट टोकन आणि $60 प्रति मिलियन आउटपुट टोकन आहे. तर, या चीनी AI मॉडेलची किंमत $0.55 प्रति मिलियन इनपुट आणि $2.19 प्रति मिलियन आउटपुट टोकन आहे. हे एआय मॉडेल तयार करण्यासाठी केवळ दोन महिने लागल्याचा दावा चिनी कंपनीने केला आहे. ओपनएआय, मायक्रोसॉफ्ट, मेटा सारख्या कंपन्यांनी त्यांचे एआय मॉडेल तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागली आणि या दिग्गज कंपन्यांनी त्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. पण, डीपसीक अतिशय कमी खर्चात तयार झाले आहे.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगलmicrosoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडो