शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मामुली किंमतीत रियलमीचा शानदार फोन; स्वस्त आणि मस्त Realme C31 घेणार भारतात एंट्री 

By सिद्धेश जाधव | Updated: February 16, 2022 12:48 IST

Realme C31 India Launch: Realme C31 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. तर मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

Realme सध्या आपल्या लो बजेट सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं Realme C35 जागतिक बाजारात लाँच केला आहे. तर आता ‘सी’ सीरीजचा अजून एक स्मार्टफोन भारतात देखील येणार आहे. हा रियलमी फोन Realme C31 नावानं देशात पदार्पण करेल. टिपस्टर मुकुल शर्मानं दिलेल्या माहितीनुसार, Realme C31 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्समध्ये भारतात येतील. 

Realme C31 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. तर मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच हा फोन Dark Green आणि Light Silver कलरमध्ये विकत घेता येईल. हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असेल, याची किंमत 10 हजारांच्या आत असू शकते.  

जागतिक बाजारात आलेल्या Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी सी35 स्मार्टफोनमधील 6.6 इंचाचा फुलएचडी+ वॉटर ड्रॉप डिस्प्ले 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 600निट्स ब्राईटनेस आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआयच्या आर एडिशनवर चालतो. याला Unisoc T616 चिपसेटची प्रोसेसिंग पावर आणि एआरएम माली जी57 जीपीयू देण्यात आला आहे. सोबत 4GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते.   

फोटोग्राफीसाठी या रियलमी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, एक मॅक्रो लेन्स आणि एक ब्लॅक अँड व्हाईट लेन्स देण्यात आली आहे. फोनमधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतं. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.   

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमी