शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल पोर्टेबिलिटी सुविधेसाठीच्या दर आकारणीत होणार कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 06:05 IST

एमएनपीमुळे मोबाइल ग्राहकांना मोबाइल क्रमांक न बदलता, एका कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या कंपनीची सेवा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

मुंबई : मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) करण्यासाठी सध्या आकारण्यात येणारे १९ रुपये शुल्क कमी करून, ५ रुपये ७४ पैसे करण्याचा प्रस्ताव भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) मांडला आहे. याबाबत सर्व संबंधितांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्या लवकरात लवकर नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

एमएनपीमुळे मोबाइल ग्राहकांना मोबाइल क्रमांक न बदलता, एका कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या कंपनीची सेवा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. २००९ पासून ही सेवा ग्राहकांना पुरविण्यात येत आहे. या सेवेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आता प्रति एमएनपी घेतला जाणारा दर कमी करण्याचा प्रस्ताव असला, तरी तो मंजूर होण्याची गरज आहे. यापूर्वी जानेवारी, २०१८ मध्ये या दरात ८० टक्क्यांची घट करून प्रति एमएनपी हा दर ४ रुपये करण्यात आला होता. मात्र, त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.

गेल्या तीन वर्षांत एमएनपी झालेल्या ग्राहकांची संख्या व त्यासाठी प्रत्यक्षात येणारा खर्च, यावर हा प्रस्ताव आधारित असल्याचे ट्रायकडून सांगण्यात आले. याबाबत ज्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी लेखी स्वरूपात याबाबत म्हणणे मांडावे, असे आवाहन ट्रायने केले आहे.

यापूर्वी एमएएनपी करण्यासाठी चार दिवसांची मुदत देण्यात आली होती. आता ती मुदत दोन दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना अवघ्या दोन दिवसांत एमएनपीची प्रक्रिया पूर्ण करून नवीन सेवेचा लाभ घेता येणे शक्य होऊ शकेल. याबाबत ट्रायशी ०११२३२३४३६७ या क्रमाकांवर संपर्क साधता येऊ शकेल. जर हा प्रस्ताव मान्य झाला, तर एमएनपी सुविधेचा लाभ घेणाºया ग्राहकांना त्याचा चांगला लाभ मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे....तर ३० सप्टेंबरपासून अंमलबजावणीमोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी सध्या आकारण्यात येणारे १९ रुपये शुल्क कमी करून ते ५ रुपये ७४ पैसे करण्याचा ट्रायचा प्रस्ताव आहे. तो मंजूर झाल्यास ३० सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

टॅग्स :Mobileमोबाइल