शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

CES 2019 : HTC बाजारात आणणार दोन नवे वर्च्युअल हेडसेट्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 16:36 IST

तंत्रज्ञानाच्या विश्वात Consumer Electronics Show चं फार मोठं स्थान आहे. कारण या शोमध्ये जगभरातील अनेक कंपन्यांना त्यांचे नवीन प्रॉडक्ट जगासमोर आणण्याची संधी मिळते.

तंत्रज्ञानाच्या विश्वात Consumer Electronics Show चं फार मोठं स्थान आहे. कारण या शोमध्ये जगभरातील अनेक कंपन्यांना त्यांचे नवीन प्रॉडक्ट जगासमोर आणण्याची संधी मिळते. ताइवान स्मार्टफोन निर्माता कंपनी एचटीसी सध्या 5जी स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहे. CES 2019 मध्ये पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहीती दिली. एचटीसी वाइव्हने घेतलेल्या प्रेस कॉन्फर्नसमध्ये, दोन नव्या 5जी फोन्ससोबत नवे हेडफोन्स आणि वीआर ब्राउझर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. 

वाइव्ह प्रो हेडसेट क्यू 2 2019मध्ये लॉन्च करण्यात येणार असून त्यामध्ये आय ट्रॅकिंग सपोर्ट सिस्टिम देण्यात आली आहे. प्रत्येक वाइव प्रो आय हेडसेटमध्ये देण्यात आलेल्या तंत्रज्ञानासह, मेन्यू नेव्हिगेशन आणि इतर अद्यायावत सुविधाही देण्यात आल्या आहेत. हे आय हेडसेट्स फक्त गेमिंग आणि शैक्षणिक वापरांसाठीच नव्हे तर बिझनेस मिटिंग आणि कोर्पोरेट युजसाठीदेखील वापरता येऊ शकतात. 

वाइव्हने आपल्या युजर्स इंटरफेससाठी एक प्रमुख ओवरहालची घोषणा केली असून डेवलपर्सने रिअ‍ॅलिटी हेडसेट्सच्या मेन्यू आणि आउट ऑफ अ‍ॅप्लिकेशनची तपासणी केली. त्यातून असं दिसलं की, त्यामध्ये 2 डी टाइल्स आणि स्क्रिनचा वापर करण्यात आला आहे. जे साधारणतः सर्वच प्लॅटफॉर्मवर करण्यात येतात. त्यामुळे यापेक्षा वेगळं काहीतरी करण्यासाठी एचटीसीने Vive Reality System यूजर्ससाठी बाजारात आणली आहे. Vive Reality System मधील Vive हे तंत्रज्ञानाला जोडून ठेवणारा दुवा आहे असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. हे तंत्रज्ञान तुम्हाला वर्च्युअल जगातून दुसऱ्या वर्च्युअल जगात घेऊन जाणार आहे. 

Vive Reality Systemमध्ये एक नवीन विशेषतः आहे ज्याला Lens असं म्हणतात. कोणत्याही Vive अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग करून तुम्ही हे तंत्रज्ञान वापरू शकता. या अॅपमध्ये वेळ, बॅटरी लाइफ आणि इतर डिवासबाबत माहीती उपलब्ध आहे. 

Vive Reality System चा वापर करणारा पहिला Vive हेडसेट Vive Cosmos आहे. पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आल्यानुसार, हे पोर्टेबल हेडसेट काही ठराविक ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. जवळपास 85 टक्के ग्राहकांना वर्च्युअल हेडफोन्स खरेदी करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याच सर्व तक्रारींचं आणि समस्यांचं निवारण करण्यासाठी COSMOS तयार करण्यात आलं आहे. हा हेडसेट याआधीच्या Vive हेडसेटच्या तुलनेत फास्ट आहेत. हे चालतानाही वापरता येऊ शकतात. एवढचं नव्हे तर यामध्ये फ्लिपऑप डिझाइनचाही उपयोग करण्यात आलेला आहे. 

Vive Cosmos इतर कोणत्याही ट्रॅकिंगचा उपयोग करत नाही. त्यामुळे मागील हेडफोन्सच्या तुलनेत हे वापरण्यासाठी अगदी सोपे असून प्रवासादरम्यानही हे घेऊन जाणं अगदी सोपं होतं. Vive Cosmosमध्ये कोणत्याही प्रकारच्या 'स्टँडअलोन' हेडसेट वापरता येत नाही. प्रेस कॉन्फरन्समध्ये असेही सांगण्यात आले की, Cosmos एका पीसी ला कनेक्ट करून किंवा इतर डिव्हाइससोबत कनेक्ट करता येते. Vive Cosmos कंपनीतर्फे कधी लॉन्च करणार होणार आहे आणि त्याची किंमत किती असेल याबाबत अद्याप कळू शकलेलं नाही. एचटीसीने सांगितलं की, याचे पहिले डेव्हलपर किट यावर्षी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. 

टॅग्स :CES 2019सीईएसtechnologyतंत्रज्ञानAmericaअमेरिकाHTCएचटीसी