शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ड्युअल स्पीकर्सयुक्त कार्बन के९ म्युझिक

By शेखर पाटील | Updated: December 22, 2017 16:12 IST

कार्बन कंपनीने ड्युअल स्पीकरची सुविधा असणारा के९ म्युझिक हा स्मार्टफोन ४,९९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

कार्बन कंपनीने ड्युअल स्पीकरची सुविधा असणारा के९ म्युझिक हा स्मार्टफोन ४,९९० रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. कॅमेरा, बॅटरी, रॅम आणि स्टोअरेज आदींप्रमाणे संगीत हादेखील स्मार्टफोनचा महत्वाचा निकष आहे. अनेक प्रिमीयम मॉडेल्समध्ये उत्तम दर्जाच्या ध्वनी प्रणाली देण्यात आलेल्या असतात. या अनुषंगाने कार्बन कंपनीने आपल्या के९ या किफायतशीर दरातील स्मार्टफोनमध्ये संगीत प्रेमींसाठी खास सुविधा दिलेली आहे. यात वर नमूद केल्यानुसार ड्युअल स्पीकर्स असतील. याच्या मदतीने उत्तम दर्जाच्या संगीताचा आनंद घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. याच्या जोडीला कंपनीने सावन या म्युझिक स्ट्रीमिंग अ‍ॅपचे तीन महिन्यांपर्यंतचे मोफत सबस्क्रीप्शनही ग्राहकाला देऊ केले आहे.

कार्बन के९ म्युझिक या मॉडेलमधील अन्य फिचर्सचा विचार केला असता, यात पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हीजीए क्षमतेचा (८५४ बाय ४८० पिक्सल्स) डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात लिथिअम-आयन या प्रकारातील २२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर ८ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल.

कार्बन के९ म्युझिक या मॉडेलमध्ये ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान केले आहेत. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानkarbonn mobileकार्बन मोबाइल