शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

नवीन आकर्षक स्वरूपात आलाय हा बजेट स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: July 24, 2018 15:30 IST

आयव्हुमी कंपनीने आपला आय २ लाईट हा स्मार्टफोन आता नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. 

आयव्हुमी कंपनीने आपला आय २ लाईट हा स्मार्टफोन आता नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच आयव्हुमी आय २ लाईट हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. याला प्रारंभी मर्क्युरी ब्लॅक, सॅटन गोल्ड आणि मार्स रेड या तीन रंगात उपलब्ध करण्यात आले होते. आता याला नेपच्युन ब्ल्यू या नवीन आकर्षक रंगाच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. आजपासून हे मॉडेल फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवर मूळ म्हणजेच ६,४९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. 

आयव्हूमी आय२ लाईट या मॉडेलमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा आणि १४४० बाय ७२० पिक्सल्स (एचडी प्लस) क्षमतेचा तसेच १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर ६७३९ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्ड वापरून वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. 

आयव्हूमी आय२ लाईट या मॉडेलच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्सच्या ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील पहिल्या कॅमेर्‍यात सोनी कंपनीचे सेन्सर असून यामध्ये सॉफ्ट फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. या दोन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अगदी सजीव वाटणार्‍या प्रतिमा घेता येतात. तर, यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. याच्या मदतीने सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसह फेस अनलॉक या फिचरचाही वापर करता येणार आहे. यामध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. 

आयव्हूमी आय२ लाईट या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स आहेत. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Mobileमोबाइलnewsबातम्या