सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आपल्या कमी किमतीतील आणि भरघोस फायद्यांच्या रिचार्ज प्लान्ससाठी ओळखली जाते. खासगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा कमी दरात अधिक डेटा आणि कॉलिंग सुविधा देणाऱ्या BSNL ने आता खास विद्यार्थ्यांसाठी असा प्लान बाजारात आणला आहे, ज्यात कमी किमतीत अनलिमिटेड कॉलिंग, 100GB डेटा आणि रोज 100 SMS मिळत आहेत.
251 रुपयांचा ‘लर्नर प्लान’
BSNL ने सोशल मीडियावर पोस्ट करत या नवीन प्लानची माहिती दिली. या स्टुडंट-फ्रेंडली प्लानची किंमत 251 रुपये असून त्यात 100GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळतात. या प्लानची वैधता 28 दिवसांची असून, हा स्पेशल ऑफर 13 डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे या प्लानचा लाभ घ्यायचा असल्यास यूजर्सना ऑफर समाप्त होण्यापूर्वीच रिचार्ज करावा लागेल.
जिओचा प्लान खूप महाग
BSNL च्या या 251 रुपयांच्या प्लानच्या तुलनेत जिओचा 28 दिवसांचा प्लान खूप महाग आहे. जिओ 349 रुपये घेते ज्यात 56GB डेटा, रोज 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग, तसेच JioHotstar आणि 18 महिन्यांसाठी Google Gemini Pro चे सबस्क्रिप्शन मिळते. डेटाच्या दृष्टीने BSNL चा प्लान जास्त किफायतशीर ठरतो.
Web Summary : BSNL launches ₹251 student plan with 100GB data, unlimited calls, 100 SMS daily. Valid for 28 days until December 13. Significantly cheaper than Jio's comparable plan, offering better data benefits.
Web Summary : BSNL ने छात्रों के लिए ₹251 का प्लान लॉन्च किया, जिसमें 100GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, और रोज 100 SMS मिलेंगे। यह प्लान 28 दिनों के लिए वैध है और 13 दिसंबर तक उपलब्ध है। जियो से सस्ता और बेहतर डेटा ऑफर।