शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

BSNL ची फ्रीडम ऑफर, 9 रुपयांत मिळणार कॉल-डेटा-SMS

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 15:53 IST

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना व्हॉइस आणि डेटा या सुविधांचा फायदा होणार आहे.

नवी दिल्ली : BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना व्हॉइस आणि डेटा या सुविधांचा फायदा होणार आहे. BSNL ने यामध्ये 9 आणि 29 रुपयांचा प्लॅन आणला आहे. हे दोन्ही प्लॅनला फ्रीडम ऑफर असे नाव दिले आहेत. 9 रुपयांच्या फ्रीडम ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉल (दिल्ली आणि मुंबई सोडून), 2 GB डेटा, आणि 100 SMS दिले जाणार आहेत. यासोबत एफयूपीच्यानंतर डेटाचे स्पीड 80 Kbps होणार आहे. याचबरोबर, ही ऑफर फक्त एक दिवसांसाठी ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना या ऑफरचा फायदा 10 ते 25 ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे.  याशिवाय, 29 रुपयांच्या ऑफरमध्ये ग्राहकांना अनलिमिडेट व्हाइस कॉल (दिल्ली आणि मुंबई सोडून) दरदिवशी 2GB डेटा आणि 100 SMS ची सुविधा दिली जाणार आहे. यामध्ये एफयूपीच्यानंतर डेटाचे स्पीड 80 Kbps होणार आहे. तसेच, ऑफरची मर्यादा सात दिवसांची असणार आहे.  दरम्यान, कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी  27 रुपयांचा वीकली प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. त्यात 1GB चा 2G आणि 3G डेटा मिळत आहे. यामध्येही 29 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच इतर सुविधा मिळत होत्या. याशिवाय कंपनीने आपल्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये सुधारणा करुन रोज 100 SMS पाठविण्याची मुभा दिली आहे. आधी या प्लॅनमध्ये महिन्याला 100 SMS करता येत होते. याबरोबरच कंपनीने आपला 491, 186 आणि 171 रुपयांचे आकर्षक प्लॅन जाहीर केले आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइलbusinessव्यवसाय