शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

एकदा रिचार्ज करा अन् वर्षभर 'या' सुविधा मिळवा; BSNL ने आणला दमदार प्लॅन, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:30 IST

BSNL Recharge Plan: BSNL देशभरात वेगाने आपले नेटवर्क वाढवत आहे.

BSNL Recharge Plan : गेल्या वर्षी खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या, त्यामुळे कोट्यवधी ग्राहक सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलकडे वळले. BSNL देखील आपला ग्राहक टिकवण्यासाठी आणि नवीन ग्राहक जोडण्यासाठी देशभरात वेगाने आपले नेटवर्क वाढवत आहे. यासोबतच कंपनी यूजर्ससाठी नवीन प्लॅनही आणत आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन वार्षिक प्लॅन लॉन्च केला आहे. 

स्वस्त आणि मोठी वैधता असलेला प्लॅनBSNL अतिशय कमी दरात आपले प्लॅन लॉन्च करते, त्यामुळे खासगी टेलिकॉम कंपन्यांना मोठे आव्हान मिळत आहे. अशातच बीएसएनएलने 1999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहे, जे स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारा प्लॅन शोधत आहेत. तुम्ही आज हा प्लान घेतल्यास तुम्हाला पुढील रिचार्ज 2026 मध्येच करावा लागेल. हा प्लान केवळ बजेट फ्रेंडलीच नाही, तर त्याची वैधता 365 दिवसांपेक्षा जास्त आहे.

योजनेचे फायदेया प्लॅन अंतर्गत ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, इंटरनेटच्या वापरासाठी या प्लॅनमध्ये एकूण 600GB डेटा मिळणार आहे. हा प्लान जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस सुविधादेखील मिळते.

अतिरिक्त फायदेबीएसएनएलचा हा प्लॅन फक्त कॉलिंग आणि डेटापुरता मर्यादित नाही, तर यात ग्राहकांना 30 दिवसांसाठी इरॉस नाऊ आणि लोकधुनचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते. 

BSNL ला ग्राहकांची पहिली पसंतीBSNL ने आपल्या परवडणाऱ्या आणि जास्त वैधतेच्या प्लॅनद्वारे Jio, Airtel आणि Vi ला तगडे आव्हान दिले आहे. खासगी कंपन्यांनी त्यांच्या योजनांच्या किमती वाढवल्या आहेत, तर बीएसएनएलने त्यांच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक बीएसएनएलकडे वळत आहेत. ज्या ग्राहकांना दीर्घ वैधता आणि कमी किंमतीत सर्वोत्तम सेवा हवी आहे, त्यांच्यासाठी BSNL चा Rs 1999 चा प्लॅन एक उत्तम पर्याय आहे.

जिओचा वार्षिक प्लॅनदरम्यान, रिलायन्स जिओचा एक वार्षिक प्लॅन आहे, ज्यासाठी तुम्हाला 3599 रुपये मोजावे लागतील. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएससह दररोज 2.5GB डेटा मिळतो. मात्र, बीएसएनएलच्या प्लॅनपेक्षा तो नक्कीच महाग आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना Jio TV, Jio Cloud आणि Jio Cinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

टॅग्स :BSNLबीएसएनएलSmartphoneस्मार्टफोनAirtelएअरटेलJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)