शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

BSNLची अजब Offer! Jio, Airtel, Vi च्या 'या' युजर्सना देणार हाय स्पीड Free डेटा, जाणून घ्या कसा...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 19:04 IST

जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर बीएसएनएलच्या या ऑफरची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 अशी आहे.

नवी दिल्ली - BSNL ने नुकतीच एक ऑफर सुरू केली आहे. यात युजर्सना 30 दिवसांसाठी म्हणजेच संपूर्ण महिनाभरासाठी मोफत डेटा दिला जाणार आहे. या ऑफरच्या माध्यमाने Jio, Airtel आणि Vi च्या युजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्याचा BSNL चा प्रयत्न आहे. तर जाणून घेऊयात या खास ऑफरबद्दल.

BSNL 30 दिवसांसाठी देत आहे फ्री इंटरनेट - सरकारी दूरसंचार कंपनी BSNL काही खास युजर्सना 30 दिवसांसाठी म्हणजे संपूर्ण महिनाभर 5GB मोफत हाय-स्पीड इंटरनेट देत आहे. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल आणि काही अटीदेखील पूर्ण कराव्या लागतील आणि त्यानंतरच तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकाल.

या खास युजर्सना मिळणार फ्री डेटा - जर तुम्हाला BSNL कडून 30 दिवसांसाठी 5GB मोफत इंटरनेट डेटा हवा असेल, तर त्यासाठी तुम्हाला BSNL व्यतिरिक्त इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीचे युजर असणे आवश्यक आहे. खरे तर, BSNL ने एक नवी मोहीम सुरू केली आहे, या मोहिमेचे नाव आहे #SwitchToBSNL. या मोहिमेअंतर्गत, तुम्ही इतर दुसऱ्या कंपनीवरून BSNL वर  स्विच केल्यास, तुम्हाला 5GB मोफत इंटरनेट मिळू शकेल.

बीएसएनएलच्या या नव्या कॅम्पेनचे नियम -  आपल्याला BSNL च्या या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर  त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बीएसएनएलचे आधिकृत फेसबुक पेज (@bsnlcorporate) आणि ट्विटर हॅन्डलला (@bsnlcorporate) फॉलो करावे लागेल. यानंतर, या कॅम्पेनशी संबंधित पोस्ट् आपल्या टाइमलाइनवर शेअर करावी लागेल. शेअर करताना #SwitchToBSNL लिहायला विसरू नका. याच बरोबर, तुम्ही BSNL वर का स्विच होत आहात हेही लिहा आणि कंपनीलाही नक्की टॅग करा. 

शेअर केल्यानंतर, त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो कंपनीला त्यांचा व्हॉट्सअॅप नंबर 9457086024 वर पाठवा. जर तुम्ही वरील सर्व स्टेप्स फॉलो केल्या असतील तर तुम्हाला 5GB बोनस डेटा मिळेल. महत्वाचे म्हणजे कंपनी कोणत्या युजर्सना बोनस डेटा देईल आणि कुणाला नाही हे कंपनीवर अवलंबून असेल.

जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर बीएसएनएलच्या या ऑफरची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 अशी आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया