शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

८४ दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज ३ GB डेटा; BSNL ने आणला स्वस्त प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:32 IST

BSNL ने पुन्हा एकदा आपल्या स्वस्त प्लॅनद्वारे खासगी कंपन्यांना धक्का दिला आहे.

भारत संचार निगम लिमिटेड, म्हणजेच BSNL वेगाने आपले नेटवर्क अपग्रेड करत आहे. कंपनीने देशभरात १ लाख नवीन ४जी/५जी मोबाइल टॉवर्स बसवले आहेत. याशिवाय कंपनी १ लाख नवीन टॉवर बसवणार आहे. यासोबतच, BSNL आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनद्वारे नवीन ग्राहकांना आकर्षित करत आहे. कंपनीने अलिकडच्या काळात अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि मोफत एसएमएस सारखे फायदे मिळतात. आता कंपनीने ८४ दिवसांचा आणखी एक स्वस्त प्लॅन जाहीर केला आहे, ज्यामध्ये दररोज ३ जीबी डेटा उपलब्ध आहे.

५९९ रुपयांचा प्लॅनबीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरु हा नवीन प्लॅन जाहीर केला आहे. कंपनीने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, ६०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच, ८४ दिवसांच्या वैधतेसह हा स्वस्त रिचार्ज प्लॅन दररोज ३ जीबी हाय स्पीड डेटा देतो. यासोबतच, मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात.

बीएसएनएल त्यांच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला बीआयटीव्हीचा मोफत अॅक्सेस देत आहे. याद्वारे ४०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहता येतात. शिवाय, यात अनेक ओटीटी अॅप्सचा अॅक्सेसदेखील मिळतो.

बीएसएनएलचा १ रुपयांचा प्लॅनबीएसएनएलने १ रुपयांचा नवीन प्लॅन जाहीर केला आहे. कंपनी १ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता देत आहे. या फ्रीडम प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण भारतातील कोणत्याही नंबरवर मोफत राष्ट्रीय रोमिंगचा फायदा मिळेल. तसेच, दररोज २ जीबी डेटा आणि १०० मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळतो. हा प्लॅन विशेषतः नवीन बीएसएनएल ग्राहकांसाठी आहे. ३१ ऑगस्ट २०२५ पूर्वी नवीन बीएसएनएल सिम खरेदी करणाऱ्यांना या ऑफरचा फायदा मिळेल.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Smartphoneस्मार्टफोन