शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

BSNL 5G चे सिमकार्ड पुण्यात आले; अधिकाऱ्यांनी ते दाखविले, Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 08:02 IST

BSNL 5G SIM Launched: सर्वजण बीएसएनएल-टाटा डीलकडे डोळे लावून बसलेले असताना पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे. 

महागड्या रिचार्जमुळे मोबाईल वापरकर्ते जेरीस आले आहेत. एकाच घरात चार-पाच मोबाईल आहेत. यांचे वर्षभर रिचार्ज करायचे म्हटले तर हजारो रुपये टेलिकॉ़म कंपन्यांना द्यावे लागणार आहेत. अशातच  सर्वजण बीएसएनएल-टाटा डीलकडे डोळे लावून बसलेले असताना पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे. 

पुण्यातील बीएसएनएल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एका मोठ्या ट्रेमधील बीएसएनएलची सीमकार्ड दाखविली आहेत. यामधून एका अधिकाऱ्याने बीएनएनएल ५जी लिहिलेले सीमकार्ड दाखविले आहे. अद्याप बीएसएनएलकडून अधिकृत याबाबत काही माहिती देण्यात आलेली नसली तरी या व्हिडीओने लवकरच बीएसएनएल 5G येणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

बीएसएनलचे अधिकारी किशोर गवळी पुणे जिल्ह्यातील 5G कार्डचे उद्घाटन करताना या व्हिडीओत दिसत आहेत. बीएसएनएलने ४जी सेवा सुरु केलेली नसताना थेट ५ जी येत असल्याने रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया कंपन्यांचे धाबे दणाणणार आहेत. 

BSNL होल्डिंग सुरुवातीला 700MHz बँड वापरणार आहे. जो स्वस्त आहे. कॅनॉट प्लेस - दिल्ली, सरकारी इनडोअर ऑफिस - बंगलोर, सरकारी कार्यालय - बंगलोर, संचार भवन - दिल्ली, जेएनयू कॅम्पस - दिल्ली, आयआयटी - दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी ५जीची चाचणी घेणार आहे. 

नुकतीच ट्रायल...केंद्रीय टेलिकॉम मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सी-डॉट कॅम्पमध्ये BSNL 5G कॉलचा अनुभव घेतला आहे. कॉल करत असताना ज्योतिरादित्य शिंदे यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, हा कॉल BSNL 5G वर करण्यात आला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी BSNL 5G द्वारे व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला. अलीकडे, BSNLच्या ग्राहक संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या व्हिडिओ कॉलची क्लिप शेअर करताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी लिहिले, "कनेक्टिंग इंडिया! BSNL 5G इनेबल फोन कॉल करून पाहिला."

टॅग्स :BSNLबीएसएनएलReliance Jioरिलायन्स जिओ