शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदा या शहरात BSNL 5G येणार...! एआय समिटमध्ये मोठी घोषणा, 'सॉफ्ट लाँच'ची तयारी, जाणून घ्या तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:54 IST

BSNL 5G Launch: बीएसएनएल युजर्सची प्रतीक्षा संपली! दिल्लीत पुढील ६ महिन्यांत ५जी चे सॉफ्ट लाँच होणार. वाचा स्वदेशी ५जी नेटवर्क आणि लाँचिंगबद्दलची सविस्तर माहिती.

सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडच्या कोट्यवधी युजर्ससाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खासगी कंपन्यांच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेले ग्राहक बऱ्याच काळापासून बीएसएनएलच्या ५जी सेवेची वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपणार असून, कंपनीने ५जी लाँचिंगचा निश्चित रोडमॅप जाहीर केला आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी दिल्लीतील एआय समिटमध्ये माहिती दिली की, पुढील सहा महिन्यांत बीएसएनएलची ५जी सेवा 'सॉफ्ट लाँच' केली जाईल.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

बीएसएनएल आपल्या ५जी सेवेची पहिली चाचणी आणि सुरुवात देशाची राजधानी दिल्ली येथून करणार आहे. सध्या कंपनी आपल्या विद्यमान ४जी इन्फ्रास्ट्रक्चरला ५जी मध्ये अपग्रेड करण्यावर भर देत आहे. "आम्ही ५जी सेवा लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत आणि दिल्लीत याचे सॉफ्ट लाँचिंग केले जाईल," असे रॉबर्ट रवी यांनी स्पष्ट केले.

बीएसएनएलचे ५जी नेटवर्क पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. यासाठी कंपनीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, तेजस नेटवर्क्स आणि सी-डॉट  यांच्याशी करार केला आहे. सध्या देशभरात १ लाखाहून अधिक ४जी टॉवर्स लावण्यात आले असून, हे सर्व टॉवर्स '५जी रेडी' आहेत. म्हणजेच सॉफ्टवेअर अपग्रेडद्वारे हे टॉवर्स लगेच ५जी सिग्नल देण्यास सक्षम होतील.

खासगी कंपन्यांना तगडी टक्करजिओ आणि एअरटेल यांनी गेल्या वर्षी आपले रिचार्ज प्लॅन्स महाग केल्यानंतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले आहेत. आता स्वस्त दरात ५जी सेवा देऊन बीएसएनएल आपली पकड पुन्हा एकदा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये यशस्वी लाँचिंगनंतर ही सेवा टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात विस्तारली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : BSNL 5G Launching Soon in Delhi: Soft Launch Preparation

Web Summary : BSNL will launch 5G services in Delhi within six months. The 5G network is based on indigenous technology. BSNL is partnering with TCS, Tejas Networks, and C-DOT. Existing 4G towers are 5G-ready, offering affordable 5G options, posing competition to Jio and Airtel.
टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेल