शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

BSNL 5G: मोठी बातमी! येत्या 5-7 महिन्यात BSNL 5G सुरू होणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 14:38 IST

Indian Telecom Industry: केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी BSNL च्या ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे.

Indian Telecom Industry: Jio आणि Airtel सारख्या दिग्गज खाजगी दूरसंचार कंपन्यांनी देशातील काही ठराविक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही कंपन्यांनी पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत, 4G पेक्षा 5G रिचार्ज महाग होईल अशी भीती अनेकांना वाटत आहे. दरम्यान, केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकारी मालकीच्या BSNL च्या ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे.

1.35 लाख टॉवरमध्ये 5G सुरू होणारउद्योग संस्था CII च्या एका कार्यक्रमात दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) म्हणाले की, बीएसएनएलचे देशभरात सुमारे 1.35 लाख मोबाइल टॉवर आहेत. या टॉवर्समध्ये लवकरच 5-जी सेवा सुरू केली जाणार आहे. येत्या 5-7 महिन्यांत 4G आधारित तंत्रज्ञान 5G वर अपडेट केले जाईल. याला चालना देण्यासाठी दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी (TTDF) वार्षिक 500 कोटींवरून 4,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे.

बीएसएनएल मजबूत स्थितीत असेलकोटक बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी दूरसंचार उद्योगातील बीएसएनएलच्या भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव म्हणाले की, दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल खूप मजबूत स्थितीत असेल. बीएसएनएलचे देशभरात सुमारे 1.35 लाख मोबाइल टॉवर आहेत. यामुळेच कंपनीचे ग्रामीण भागात खूप मजबूत अस्तित्व आहे. अनेक भागांमध्ये इतर दूरसंचार कंपन्या अद्याप पोहोचू शकलेल्या नाहीत. पण, बीएसएनएल सर्वत्र आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल5G५जीAirtelएअरटेलJioजिओ