सिंगापूर पोलीस दलाने फसवणुकीच्या आरोपाखाली तीन जणांना अटक केली आहे. अमेरिकेच्या व्यापार निर्बंधांना डावलून चीनी एआय कंपनी डीपसीकला एनव्हीडिया जीपीयूच्या कथित बेकायदेशीर एक्सपोर्ट प्रकरणी अटक करण्यात आली आहे. संयुक्त कारवाईत, पोलीस आणि कस्टम अधिकाऱ्यांनी २२ ठिकाणी छापे टाकले, नऊ संशयितांना ताब्यात घेतले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच कागदपत्रे जप्त केली आहेत.
Technology : उन्हाळ्यात मोबाईल स्फोटाचे प्रमाण जास्त; गॅझेटचे नियम पाळा, संभाव्य धोका टाळा!
२०२४ मध्ये सिंगापूर अचानक एनव्हीडियाचे दुसरे सर्वात मोठे महसूल केंद्र बनले, यामुळे अनेकांना शंका आली होती की या ठिकाणापासून चीनमध्ये GPU ची तस्करी केली जात आहे. एनव्हीडियाने हे दावे फेटाळून लावले, असे म्हटले की त्यांच्या बिलिंग स्थानांवर GPUs शेवटी कुठे येतात हे दिसून येत नाही. सिंगापूरने त्यांच्या आर्थिक वर्ष २०२५ च्या शिपमेंटमध्ये २% पेक्षा कमी वाटा उचलला होता.
डीपसीकने त्यांचे ओपन-सोर्स एआय मॉडेल्स आणि चॅटबॉट लाँच केल्यानंतर अमेरिकेच्या वाणिज्य विभागाची देखरेख वाढवली. यामुळे त्यांनी बंदी असलेल्या चीपमध्ये एक्सेस मिळवला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. निर्यात नियंत्रणे असूनही चिनी सैन्य, सरकारी एआय लॅब आणि विद्यापीठांनी बंदी घातलेले अमेरिकन सेमीकंडक्टर मिळवले आहेत, असं रॉयटर्सने वृत्त दिले होते.
या पुराव्यावरुन चीपची तस्करी होते असं समोर आले आहे. सिंगापूरमधील मध्यस्थ चीनला एआय आणि उच्च-कार्यक्षमता संगणनासाठी वापरले जाणारे उच्च-कार्यक्षमता असलेले एनव्हीडिया जीपीयू पुरवत होते असा आरोप आहे. हे अमेरिकेच्या निर्यात नियमांचे उल्लंघन करते. अधिकारी अजूनही ऑपरेशनच्या व्याप्तीची माहिती घेत आहेत.
याबाबत आता सिंगापूर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. एकतर्फी परदेशी निर्यात मर्यादा लादण्यास बांधील नाही, पण त्यांच्या अधिकारक्षेत्रातील कंपन्यांनी संबंधित नियमांचे पालन करावे. जागतिक निर्बंधांना टाळण्यासाठी सिंगापूरच्या व्यापार प्रणालींचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही, असंही सांगण्यात येत आहे.