शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Airtel, Jio ला मोठा झटका! BSNL चे ग्राहक 25 लाखांनी वाढले; इतक्या स्वस्त रिचार्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 21:24 IST

BSNL User : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती 11-25% नी वाढवल्यामुळे अनेकजण BSNL कडे वळत आहेत.

BSNL User : 3 जुलै आणि 4 जुलै रोजी खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi (Vodafone Idea) ने त्यांच्या रिचार्जच्या किमतीत 11-25% दरवाढ केली. त्यामुळे आता अनेक ग्राहक भारत संचार निगम लिमिटेड, म्हणजेच BSNL कडे वळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने BSNL च्या ग्राहक संख्येत वाढ होत आहे. ही संख्या थोडी थोडकी नसून, लाखोंमध्ये आहे.

एकीकडे खासगी कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत, तर दुसरीकडे BSNL ग्राहकांना कमी किमतीत चांगले रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहे. त्यामुळेच BSNL च्या ग्राहक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतर सुमारे 25 लाख ग्राहकांनी BSNL चे नवीन नंबर घेतले आहेत, किंवा त्यांचे जुने नंबर  पोर्ट केले आहेत.

4G आणि 5G मध्ये बदलBSNL वेगाने 4G रोलआउटकडे वाटचाल करत असून, सरकार त्याला लवकरच 5G मध्ये बदलण्याचा विचार करत आहे. आपल्या नेटवर्कमध्ये सुधारणा केल्यानंतर BSNL च्या ग्राहकांची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, कंपनी आपल्या नवीन ग्राहकांना मोफत सिमकार्ड देत आहे. ही लॉन्चिंग ऑफर तीन महिन्यांसाठी उपलब्ध आहे.

1.12 लाख टॉवर बांधले जातीलBSNL ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, BSNL 4G आणि 5G नेटवर्कसाठी देशभरात सुमारे 1.12 लाख टॉवर्स बसवणार आहे. कंपनीने आतापर्यंत 12,000 4G टॉवर बसवले असून, त्यापैकी 6,000 टॉवर पंजाब, उत्तर प्रदेश पश्चिम, हिमाचल प्रदेश आणि हरियाणा मंडळांमध्ये अॅक्टिव्ह आहेत. लवकरच देशभरातील इतर राज्यांमध्ये याचा विस्तार केला जाईल. BSNL ने 4G सेवेसाठी TCS, तेजस नेटवर्क आणि सरकारी ITI सोबत भागीदारी केली आहे.

BSNL चा स्वस्त प्लॅनBSNL ने ग्राहकांसाठी एक स्वस्त प्लॅन आणला आहे. 229 रुपयांच्या रिचार्जमध्ये महिनाभर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. विशेष म्हणजे, हा प्लॅन पूर्ण एका महिन्यासाठी आहे. समजा, तुम्ही 1 जुलै रोजी रिचार्ज केले, तर हा प्लॅन 1 ऑगस्टपर्यंत चालेल. इतर कंपन्यांचे प्लॅनमध्ये फक्त 28 दिवसांची वैधता मिळते.

395 डिवसांचा प्लॅन

बीएसएनएलचा 395 दिवसांचा प्लॅन 2,399 रुपयांना मिळतो. यामध्ये यूजरला दररोज 2 gb डेटा मिळ आणि देशभरातील सर्व नेटवर्क्सवर अमर्यादित व्हॉईस कॉलचा लाभ मिळेल. याशिवाय 100 एसएमएसची सेवाही उपलब्ध आहे. याशिवाय, झिंग म्युझिक, बीएसएनएल ट्यून्स, हार्डी गेम्स, चॅलेंजर अरेना गेम्स आणि गेमऑन ॲस्ट्रोटेल सारख्या सेवादेखील उपलब्ध असतील.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओSmartphoneस्मार्टफोनbusinessव्यवसाय