शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

अलर्ट! Aadhar Card अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक, खोट्या वेबसाईटपासून राहा सावध अन्यथा बसेल मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 13:39 IST

Aadhar Card Update : आधार कार्ड अपडेट किंवा काही करेक्शन करायच्या नावाखील अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहेत.

नवी दिल्ली - आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळेच त्यावरील माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. अनेकदा जन्मतारीख, पत्ता अथवा काहीतरी चूक असल्यास ते अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र याचाच फायदा काही फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जातो. आधार कार्ड अपडेट (Aadhar Card Update) किंवा काही करेक्शन (Correction) करायच्या नावाखील अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहेत. त्यामुळे आधार कार्डमध्ये बदल करताना, काही अपडेट करताना काळजी घेणं गरजेचं आहे. 

आधार अपडेटच्या नावाखाली काही खोट्या वेबसाईट्सद्वारे लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. या वेबसाईट्सवरही कॉमन सर्विस सेंटरवर (CSC) केल्या जाणाऱ्या प्रोसेसप्रमाणेच काम होतं. युजर्सची फसवणूक करण्यासाठीच खोट्या वेबसाईट कॉमन सर्विस सेंटरप्रमाणे (Common Service Center) काम करतात. त्यामुळे अशा बनावट वेबसाईट्सपासून अत्यंत सावध राहा. 

आधार कार्ड अपडेट करण्याची योग्य पद्धत पुढीलप्रमाणे 

- आधार कार्डवर कोणतीही माहिती अपडेट करायची असल्याची किंवा इतर माहितीसाठी, आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जा. 

-  WWW.UIDAI.IN ही अधिकृत वेबसाईट असून या ठिकाणी आधार कार्डबाबत सर्व माहिती मिळू शकेल. 

- UIDAI च्या वेबसाईटवर काही कॉमन सर्विस सेंटरची नावं देण्यात आली आहेत. त्या सेंटरवर जाऊन आधार कार्ड अपडेट करता येतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आधारकार्डवरील पत्ता बदलणं झालं आता आणखी सोपं, जाणून घ्या कसं

आधार कार्डवरील पत्त्यामध्ये काही चूक असते अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेल्यास पत्ता बदलण्यासाठी अडचण येते. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आधार कार्डवरील पत्ता बदलणं आणखी सोपं झालं आहे. नवीन नियमानुसार आधारकार्डवरील पत्ता बदलणं आधीपेक्षा आता सोपं झालं आहे. यूआयएडीआयकडून सेल्फ डेक्लेरेशन लेटरच्या मदतीने पत्ता बदलला जाईल. यासाठी भाडे करार किंवा इतर कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. ज्या व्यक्तीला पत्ता बदलायचा आहे, त्यांना आधार केंद्रावर जाऊन सेल्फ डेक्लेरेशन फॉर्म द्यावा लागेल आणि तुमचा पत्ता बदलला जाईल. ऑनलाईन आधार कार्डवरील पत्ता कसा बदलायचा हे जाणून घेऊया. 

- सर्वप्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा. त्यामध्ये My Adhaar वर क्लिक करा. यामध्ये Udate Your Aadhaar मध्ये जाऊन ड्रॉपडाऊनमधील तिसरा पर्याय Update your address online वर क्लिक करा.  

- क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर Proceed to Update Address  वर क्लिक करा. यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल.

- पेजवर आधी आधार नंबर, कॅप्चा व्हेरिफिकेशन टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा. आधारसोबत रजिस्टर्ड असलेल्या नंबरवर एक मेसेज येईल. त्यातील कोड घेऊन तो ओटीपीच्या जागी टाका आणि लॉगइन करा.

- पेजवर Update Address via Address Proof, Update Address via Secred Code असे पर्याय दिलेले असतील. Address Proof पर्याय निवडल्यानंतर नवा पत्ता टाका. तसेच योग्य कागदपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करा. नातेवाईकाचा पत्ता आधार कार्डमध्ये टाकू इच्छित असाल तर त्याच्यासाठी दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे.

- पर्यायावर क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा. ऑनलाईन व्हेरिफिकेशननंतर आधारकार्डवर पत्ता बदलला जाईल आणि नवीन आधारकार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवलं जाईल. 

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डtechnologyतंत्रज्ञान