नवी दिल्ली - आधारकार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळेच त्यावरील माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. अनेकदा आधारकार्डवरील पत्त्यामध्ये काही चूक असते अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेल्यास पत्ता बदलण्यासाठी अडचण येते. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आधारकार्डवरील पत्ता बदलणं आणखी सोपं झालं आहे. 

नवीन नियमानुसार आधारकार्डवरील पत्ता बदलणं आधीपेक्षा आता सोपं झालं आहे. यूआयएडीआयकडून सेल्फ डेक्लेरेशन लेटरच्या मदतीने पत्ता बदलला जाईल. यासाठी भाडे करार किंवा इतर कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. ज्या व्यक्तीला पत्ता बदलायचा आहे, त्यांना आधार केंद्रावर जाऊन सेल्फ डेक्लेरेशन फॉर्म द्यावा लागेल आणि तुमचा पत्ता बदलला जाईल. ऑनलाईन आधारकार्डवरील पत्ता कसा बदलायचा हे जाणून घेऊया. 

- सर्वप्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा. त्यामध्ये My Adhaar वर क्लिक करा. यामध्ये Udate Your Aadhaar मध्ये जाऊन ड्रॉपडाऊनमधील तिसरा पर्याय Update your address online वर क्लिक करा.  

- क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर Proceed to Update Address  वर क्लिक करा. यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल.

- पेजवर आधी आधार नंबर, कॅप्चा व्हेरिफिकेशन टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा. आधारसोबत रजिस्टर्ड असलेल्या नंबरवर एक मेसेज येईल. त्यातील कोड घेऊन तो ओटीपीच्या जागी टाका आणि लॉगइन करा.

- पेजवर Update Address via Address Proof, Update Address via Secred Code असे पर्याय दिलेले असतील. Address Proof पर्याय निवडल्यानंतर नवा पत्ता टाका. तसेच योग्य कागदपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करा. नातेवाईकाचा पत्ता आधार कार्डमध्ये टाकू इच्छित असाल तर त्याच्यासाठी दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे.

- पर्यायावर क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा. ऑनलाईन व्हेरिफिकेशननंतर आधारकार्डवर पत्ता बदलला जाईल आणि नवीन आधारकार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवलं जाईल. 

करदात्यांना आयकर विभागाने सुविधेसाठी पॅन नंबर ऐवजी 12 अंकी आधार नंबर देण्याची मुभा दिली आहे. पण असं करताना अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. कारण चुकीचा आधार नंबर दिल्यास 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.वित्त विधेयक 2019 मधील 1961च्या नियमातील दुरुस्तीनुसार पॅन नंबर ऐवजी आधार नंबर वापरण्यास नागरिकांना मंजुरी देण्यात आली. पण चुकीचा आधार नंबर दिल्यास 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे पॅन ऐवजी तुम्ही आधार नंबर देत असाल त्यावेळी हा नियम लागू होतो. कर परतावा भरताना, बँक खातं, डिमॅट अकाऊंट आणि 50 हजार रुपयांपेक्षा अधिकचे म्युच्युअल फंड किंवा बॉण्ड खरेदीवेळी पॅन नंबर बंधनकारक आहे. 


आधार नंबर हा युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (UIDAI) देण्यात येतो. या प्रकरणात युआयडीएआय दंड करत नाही तर आयकर विभाग करतो. पॅनच्या जागी चुकीचा आधार नंबर दिल्यावर, मोठ्या रकमेच्या व्यवहारावेळी आधार किंवा पॅन नंबर दिला नसल्यास दंड भरावा लागेल. तसेच फक्त आधार नंबर देणं पुरसे नाही. बायोमॅट्रीक आयडेंटिटी ऑथेंटिकेट करावी लागेल. पण ती करता नाही आली तर दंड भरावा लागणार आहे. दोन फॉर्म्सवर चुकीचा आधार नंबर दिला, तर प्रत्येकी 10-10 हजार रुपये असा 20 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. 
 

Web Title: how to change your aadhaar address online as per new rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.