शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात गिफ्ट देणाऱ्या ई-मेलपासून राहा सावध, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 14:09 IST

नववर्षात युजर्सना फ्री गिफ्टचं आमिष दाखवलं जात आहे.

ठळक मुद्देनववर्षात हॅकर्स युजर्सना फ्री गिफ्टचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत आहेत.'Start your 2020 with a gift from us' या नावाने ई-मेल येत असून यातून फसवणूक केली जाते.नवीन वर्षात गिफ्ट दिलं जाईल असं सांगणारे ई-मेल्स पाठवले जात आहेत.

नवी दिल्ली - ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रमाण हे दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. नववर्षात हॅकर्स युजर्सना फ्री गिफ्टचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत आहेत. 'Start your 2020 with a gift from us' या नावाने ई-मेल येत असून यातून फसवणूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. युजर्सचा पर्सनल डेटा अ‍ॅक्सिस करण्यासोबतच बँक अकाऊंटमधून पैशाची देखील चोरी केली जात आहे. 

नवीन वर्षात गिफ्ट दिलं जाईल असं सांगणारे ई-मेल्स पाठवले जात आहेत. यामध्ये एक फेक लिंक देण्यात आलेली असते त्यावर क्लिक करण्यास युजर्सना सांगितलं जातं. देण्यात आलेली फेक लिंक ही हुबेहुब खऱ्या लिंकप्रमाणेच दिसते. काही लिंकमध्ये हॅकर्स युजर्सना मॅकबूकचं आमिष दाखवतात. तसेच दुसऱ्या देशातून पार्सल येईल याची वाट पाहणाऱ्या युजर्सना हॅकर्स लक्ष्य करत आहेत. मात्र अशा फेक लिंकपासून सावध राहणं गरजेचं आहे.

एका सिक्यॉरिटी फर्मशी संबंधित असलेल्या रिसर्चरनी दिलेल्या माहितीनुसार, वस्तूच्या डिलिव्हरीला सिक्यॉरिटी चेकमुळे उशीर होत असल्याचं कारण अनेकदा युजर्सना मेलमध्ये दिलं जातं. तसेच त्यासाठी डिलिव्हरी चार्जही मागितला जातो. युजर्सचा विश्वास बसावा यासाठी ईमेलमध्ये एक ट्रेकिंग कोड आणि लिंक पाठवतात. यामुळेच अगदी सहजतेने युजर्स हॅकर्सच्या जाळ्यात येतात. तसेच वेगवेगळ्या पद्धतीने हॅकर्स लोकांची फसवणूक करत आहेत. 

बँकेचे व्यवहार, नोटिफिकेशन, पॉलिसी अपडेट यासारख्या प्रोफेशनलपासून पर्सनल गरजांसाठी ई-मेलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असलेल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात. ई-मेलच्या माध्यमातून अनेक व्यवहार केले जातात. त्यामुळे युजर्सना मार्केटिंग आणि प्रोडक्ट्स प्रमोशनसंबंधीत खूप मेल येत असतात. सातत्याने येणारे अशाप्रकारचे मेल हे त्रासदायक ठरतात. तसेच अनेकदा अशा स्वरुपाच्या ई-मेलमुळे युजर्सचा डेटा चोरीला जाण्याची देखील शक्यता असते.

जीमेलच्या अनेक फीचरची सर्वसामान्यांना माहिती नाही. अनेक जण केवळे ईमेल, अटॅचमेंट पाठवण्यासाठी आणि रिसीव्ह करण्यासाठी फक्त जीमेलचा वापर करतात. सध्याच्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटल मार्केटिंगच्या युगात युजर्सना अनेक प्रमोशनल ईमेल हे सातत्याने येत असतात. Gmail इनबॉक्समधील नको असलेल्या ईमेल्सची संख्या ही वाढत असते. अशाप्रकाचे प्रमोशनल ईमेल डिलीट केले नाहीत तर इनबॉक्स नको असलेल्या ईमेल्सनेच पूर्ण भरून जातो. असे मेल करणाऱ्यांना ब्लॉक करता येतं. 

या' बातम्याही नक्की वाचा

आता स्मार्टफोनला करा टीव्हीचा रिमोट; कसं ते जाणून घ्या

जगातील सर्वात छोटा 3G स्मार्टफोन लाँच; वजन फक्त 31 ग्रॅम, जाणून घ्या खासियत

Google Maps पार्किंग स्पेस शोधण्यास मदत करणार; फॉलो करा सोप्या स्टेप्स... 

लय भारी! युजर्सच्या प्रायव्हसीसाठी फेसबुकने आणले 'हे' 4 दमदार फीचर्स

Whatsapp वर आला 'New Year Virus'; वेळीच व्हा सावध

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान