शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

चार्जर गायब केल्यावर अ‍ॅप्पलचा आणखी एक मोठा निर्णय; यापुढे ‘हे’ iPhone रिपेअर होणार नाहीत 

By सिद्धेश जाधव | Updated: March 30, 2022 13:27 IST

जर कंपनीच्या अंतगर्त सिस्टम ‘हरवलेला फोन’ असं दर्शवत असेल, तर टेक्निशियनने तो फोन दुरुस्त करू नये, असं अ‍ॅप्पलनं सांगितलं आहे.

Apple च्या पॉलिसीनुसार कंपनी हरवलेले किंवा चोरीला गेलेले डिवाइस रिपेअर करत नाही, जर त्या फोनमध्ये ‘फाईंड माय डिवाइस’ फिचर इनेबल केलेलं असेल. परंतु आता कंपनी GSMA डिवाइस रजिस्ट्रीवर रिपोर्ट करण्यात आलेले आयफोन्स रिपेअर करण्यास नकार देणार आहे, अशी माहिती 9to5mac या वेबसाईटनं दिली आहे.  

यासाठी कंपनीनं आपला अ‍ॅप्पल स्टोरमधील कर्मचाऱ्यांना आणि अधिकृत सर्व्हिस प्रोव्हायडर्सना मेमो पाठवला आहे. त्यानुसार, कंपनीनं आता जीएसएमए डिवाइस रजिस्ट्रीच्या डाटाबेसचा वापर करणार आहे, तिथे डिवाइस हरवलेला किंवा चोरीला गेला असल्याची नोंद आहे की नाही हे फोन दुरुस्त करण्याआधी बघून घ्यावं. जर कंपनीच्या अंतगर्त सिस्टम ‘हरवलेला फोन’ असं दर्शवत असेल, तर टेक्निशियनने तो फोन दुरुस्त करू नये.  

जीएसएमए डिवाइस रजिस्ट्री (GSMA Device Registry) हा एक जागतिक डेटाबेस आहे जिथे स्मार्टफोन मालक हरवलेल्या, चोरीला गेलेल्या किंवा फसवुणकीची माहिती देतात. ज्या कंपन्यांकडे या डेटाबेसचा अ‍ॅक्सेस आहे त्या आयएमईआय नंबरच्या मदतीने स्मार्टफोनची स्थिती जाणून घेऊ शकतात.  

या नव्या नियमामुळे चोरीला गेलेल्या आयफोन्सच्या बदल्यात नवीन आयफोन दिला जाणार नाही, जर जुना आयफोनमध्ये फाईंड माय डिवाइस बंद असेल तर. ज्या डिवाइसमध्ये हे फिचर इनेबल असेल त्यांच्यावर या नव्या नियमाचा प्रभाव पडणार नाही, असे आयफोन सध्याही कंपनी रिपेअर करत नाही. तसेच जर तुम्ही तुमचा अ‍ॅप्पल आयडी अ‍ॅक्सेस करू शकत नसाल तर तुम्ही डिवाइसचं बिल देखील पुरावा म्हणून दाखवू शकता.  

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान