शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

मजबूत डिस्प्लेसह Apple Watch Series 7 सादर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: September 15, 2021 12:25 IST

Apple Watch Series 7 Price: Apple Event 2021 मध्ये नवीन आणि मजबूत डिजाईनसह Watch Series 7 लाँच केली आहे.  

Apple Event 2021 च्या मंचावरून iPad 2021, iPhone 13 Series सह Apple Watch Series 7 ग्राहकांच्या भेटीला आली आहे. या वॉच सीरिजमधील सर्वात मोठा बदल म्हणजे ऑलवेज-ऑन रेटिना डिस्प्ले. अ‍ॅप्पल वॉच सीरीज 7 मध्ये पूर्णपणे नवीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील बेजल 40 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे डिस्प्लेचा आकार वाढला आहे. नव्या आकारामुळे या वॉचमध्ये जास्त टेक्स्ट आणि फुल QWERTY कीबोर्ड सहज वापरता येतो. त्यामुळे आता वॉचवरून देखील मेसेजसना रिप्लाय देता येईल.  

Apple Watch Series 7  ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

Apple Watch 7 Series ची किंमत 399 डॉलरपासून सुरु होईल. ही किंमत 29,400 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होईल. कंपनीने वॉच सीरिजमधील जुन्या दोन मॉडेल्सची विक्री अजूनही सुरु ठेवली आहे. यात Apple Watch 3 आणि Apple Watch SE चा समावेश आहे. ज्यांची किंमत क्रमशः 199 यूएस डॉलर (सुमारे 14,700 रुपये) आणि 299 डॉलर (सुमारे 22,000 रुपये) असेल.  

Apple वॉच सीरीज 7 IP6X डस्ट रेजिस्टेंससह सादर करण्यात आली आहे. ही सीरिज 18 तासांचा बॅटरी लाईफ देईल, असे कंपनीने सांगितले आहे. जुन्या वॉच सीरीजच्या तुलनेत ही सीरिज USB-C च्या मदतीने 30 टक्के जास्त वेगाने चार्ज करता येईल. यातील watchOS 8 क्विकपाथसह एका फुल कीबोर्डला सपोर्ट करतो. या वॉचमध्ये ईसीजी आणि ब्लड ऑक्सीजन मॉनिटर सारखे फिचर मिळतात.  

Apple Watch Series 7 कंपनीची आतापर्यंतची सर्वात मजबूत Apple वॉच असेल, असे कंपनीने म्हटले आहे. नवीन वॉच सीरीजमध्ये नवीन वॉच फेस देण्यात आले आहेत. तसेच वर्कआउट करताना यातील फॉल डिटेक्शन फीचर देखील खूप उपयुक्त ठरू शकते. Apple Watch 7 सीरिज 41mm आणि 45mm अश्या दोन साईजमध्ये सादर करण्यात आली आहे.  

टॅग्स :Apple Incअॅपल