शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अ‍ॅपल पे ही डिजिटल पेमेंट प्रणाली लवकरच भारतात उपलब्ध होणार

By शेखर पाटील | Updated: September 19, 2017 11:29 IST

अ‍ॅपल कंपनी लवकरच भारतात आपली अ‍ॅपल पे ही डिजीटल पेमेंट प्रणाली लाँच करणार असल्याचे संकेत मिळाले असून याची चाचणीदेखील सुरू झाली आहे. भारतात डिजीटल पेमेंट सिस्टीममध्ये सध्या प्रचंड चुरस सुरू झाली आहे

ठळक मुद्देअ‍ॅपल पे ही पेटीएम आणि सॅमसंग पे यांच्याप्रमाणे कॉन्टॅक्टलेस डिजीटल पेमेंट सिस्टीम आहेयुजर आपल्या क्रेडीट वा डेबिट कार्डाच्या मदतीने विविध प्रकारचे व्यवहार अगदी सुलभपणे करू शकतोयासाठी अ‍ॅपल पे प्रणालीच्या प्रोसेसींगसाठी आवश्यक असणार्‍या उपकरणाची आवश्यकता लागते

अ‍ॅपल कंपनी लवकरच भारतात आपली अ‍ॅपल पे ही डिजीटल पेमेंट प्रणाली लाँच करणार असल्याचे संकेत मिळाले असून याची चाचणीदेखील सुरू झाली आहे. भारतात डिजीटल पेमेंट सिस्टीममध्ये सध्या प्रचंड चुरस सुरू झाली आहे. विशेषत: नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे मोबाईल वॅलेटसह अन्य डिजीटल पेमेंट सिस्टीम्सची लोकप्रियतादेखील वाढीस लागली आहे. अलीकडच्या कालखंडाचा विचार करता केंद्र सरकारच्या युपीआय या प्रणालीवर आधारित डिजीटल पेमेंट सिस्टीम्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहेत. आताच गुगलने यावरच आधारित तेज ही प्रणाली लाँच केली असून व्हाटसअ‍ॅपदेखील येत्या काही दिवसात याच स्वरूपाची डिजीटल पेमेंट सिस्टीम सादर करण्याची शक्यता आहे.

या पार्श्‍वभूमिवर, आपण स्पर्धेत मागे राहू नये म्हणून अ‍ॅपल कंपनी लवकरच आपली अ‍ॅपल पे ही डिजीटल पेमेंट सिस्टीम भारतात सादर करण्याची शक्यता आहे. अ‍ॅपल पे ही पेटीएम आणि सॅमसंग पे यांच्याप्रमाणे कॉन्टॅक्टलेस डिजीटल पेमेंट सिस्टीम आहे. यात युजर आपल्या क्रेडीट वा डेबिट कार्डाच्या मदतीने विविध प्रकारचे व्यवहार अगदी सुलभपणे करू शकतो. अर्थात यासाठी अ‍ॅपल पे प्रणालीच्या प्रोसेसींगसाठी आवश्यक असणार्‍या उपकरणाची आवश्यकता लागते. या प्रणालीच्या मदतीने कुणीही आपल्या क्रेडीट वा डेबिट कार्डचा थेट उपयोग न करतांनाही विविध प्रकारचे ट्रान्जेक्शन्स करू शकतो. यासाठी टच आयडी आणि फेशियल रेकग्नीशन प्रणालीचा पासवर्ड म्हणून उपयोग करण्यात येतो.

अ‍ॅपल पे ही प्रणाली जगातील अनेक देशांमध्ये आधीच सादर करण्यात आली आहे. आयफोन ६ आणि त्यावरील सर्व आवृत्त्यांमध्ये अ‍ॅपल पे वापरणे शक्य आहे. याशिवाय आयपॅड, अ‍ॅपल स्मार्टवॉच, मॅकबुक प्रो तसेच अलीकडेच जाहीर झालेल्या आयफोन-एक्स, आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस या तिन्ही मॉडेल्समध्येही याचा वापर शक्य आहे. हे मॉडेल्स लवकरच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहेत. यानंतर लागलीच अ‍ॅपल पे प्रणालीसही अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत. यासाठी अ‍ॅपल कंपनीने एचडीएफसी, स्टँडर्ड अँड चार्टर्ड बॅक, सिटी बँक आदी बँकांसह स्टारबक्स, क्रोमा स्टोअर्स आदी शॉपीजसोबत बोलणी सुरू केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. अर्थात यामुळे येत्या काही दिवसांमध्येच अ‍ॅपल पे सिस्टीम भारतात लाँच होणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :MobileमोबाइलApple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X